Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबतच सात महिन्यापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले त्यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी घरवापसी करत शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भास्करराव पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) व काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत मीनल पाटील खतगावकर यांनी ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजते. (Ashok Chavan News)
लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, आता भास्करराव खतगावकर यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर या इच्छुक आहेत. नायगावमध्ये सध्या भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार असून याच मतदारसंघातून त्या इच्छुक असल्याने भाजपकडून त्यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत महाविकास आघाडीची उमेदवारी फायनल केली असल्याची चर्चा आहे.
मीनल खतगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. पण 2019 मध्ये विधानसभेला आणि 2024 मध्ये नांदेड लोकसभेसाठी इच्छुक होत्या. दोन्ही वेळा त्यांना माघार घ्यावी लागल्याने आता पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवली होती.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील समीकरणे हे पूर्णपणे बदलले होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभेला त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.