Bjp News : हसन मुश्रीफांनी चार जागा मागितल्या तर आम्ही पाच जागा मागणार; धनंजय महाडिकांचे मोठं विधान

Political News: सत्ता महायुतीची येणार असल्याने इच्छुकांची गर्दी जास्त आहे. हसन मुश्रीफांनी चार जागा मागितल्या तर आम्ही पाच जागा मागणार असल्याचे मोठं विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Dhananjay Mahadik, Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. मविआ आणि महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असताना सर्वच पक्षांकडून एकमेकांच्या जागांवर दावा केला जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महायुती मजबूत स्थितीत आहे. चंद्रकांतदादा पाटील, मुश्रीफ साहेब, विनय कोरे महायुतीत असल्यानं सकारात्मक चिन्ह आहे. सत्ता महायुतीची येणार असल्याने इच्छुकांची गर्दी जास्त आहे. ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत, त्यांना उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात असले तरी हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) चार जागा मागितल्या तर आम्ही पाच जागा मागणार असल्याचे मोठं विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले आहे.

त्याचबरोबर ज्या पक्षाचा उमेदवार दोन नंबरला राहिला आहे त्यांना ती जागा मिळेल, असाच फॉर्म्युला असणार आहे. कागलमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेतली. यामध्ये महायुतीच्या उमेदवाराबरोबर कायम राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी अचानक बैठक घेतली. मी त्यांना महायुतीच्या उमेदवाराबरोबर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा केला आहे, असेही महाडिक म्हणाले.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Solapur Politics : कट्टर विरोध, 30 वर्षे संघर्ष अन् आता सोबती..! मोहिते पाटील जानकरांना 'आमदार' करणार!

येत्या काळात शिवसेना शिंदे गट देखील काही जागांवर दावा करतील, कारण ते माजी आमदार आहेत. पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात पाच जागांची मागणी करणार आहोत. भाजपची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे आम्ही पाच जागा मागणार आहोत. मात्र, कुणाला किती जागा द्यायच्या हे वरिष्ठ नेते ठरवतील, असेही भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif
Narendra Modi News : काँग्रेसला गणेशोत्सवाची चीड आहे का? पीएम मोदींनी केली विचारणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com