Uday Samant, Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat CDR revelations: खरातचे एकनाथ शिंदेंना कॉल, अंधारेंच्या आरोपावर उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'ही वृत्ती...'

Eknath Shinde call News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु आहे. त्यामधून नवनवीन खुलासे होत असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खरातच्या 'कॉल डिटेल रेकॉर्ड'चा (CDR) हवाल्याने खळबळजनक माहिती समोर आणली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु आहे. त्यामधून नवनवीन खुलासे होत असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खरातच्या 'कॉल डिटेल रेकॉर्ड'चा (CDR) हवाल्याने खळबळजनक माहिती समोर आणली आहे. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. कोणत्या नेत्याने कितीवेळा खरातला कितीवेळा फोन केले याचे रेकॉर्डच अंधारे यांनी सादर केले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याचे समोर आल्यानंतर यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे विधान केले आहे.

सुषमा अंधारे व अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचे फोनवर बोलणं झाले आहे. त्यांनी अशोक खरातच्या कृत्याचे समर्थन केलेले नाही. आता त्याने या नेत्यांशी बोलणं झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. मात्र, ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे, असे सामंत म्हणाले.

आमच्या बाजूला येऊन काही लोक फोटो घेतात. मग त्याने काही चुकीचे कृत्य केले तर त्यात आम्ही सामील आहोत का? असा सवाल सामंत यांनी केला. खरातच्या कृत्याचे समर्थन आम्ही केलेले नाही, त्यामुळे त्याच्याशी आम्हचा कसलाच संबंध नसल्याचे उदय सामंत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

त्यासोबतच यावेळी सामंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नाला उत्तरे दिली आहेत. त्यासोबतच जाणीवपूर्वक एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात नसेल तर कडक कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला. एमएनजीएलकडून हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवण्यास दिरंगाई होत आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. एमएनजीएल गॅसचा पुरवठा जाणीवपूर्वक केला जात नसेल तर कडक कारवाई करु असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएल गॅस देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मात्र जाणीवपूर्वक आर्टिफिशियल तुटवडा निर्माण होत असेल तर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल असे सामंत म्हणाले. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (LNG) च्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना दैनंदिन वापरासाठी 100 टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT