Maharashtra Politics Update: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का; दोन नेत्यांच्या राजीनाम्यानं खळबळ

Political Breaking Live Marathi Headlines Updates : ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोकुळ दूध संघाची चौकशी होणार, यासह आज 2 एप्रिल 2026 रोजीच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Eknath Shinde team preparing for political strategy
Eknath Shinde team preparing for political strategySarkarnama
Published on
Updated on

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का; दोन नेत्यांच्या राजीनाम्यानं खळबळ

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे नाभिक सेनेचे खजिनदार अनिल शिंदे व मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब समुद्रे यांनी करुणा मुंडेंच्या स्वराज्य शक्ती सेनामध्ये पक्षप्रवेश केला आहे.

मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत राडा, SIR प्रक्रियेच्या नियुक्तीवरुन हाणामारी  

मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत गुरुवारी मोठा राडा झाला. निवडणूक आयोगाच्या मतदारयादी पडताळणी आणि नकाशीकरण (एसआयआर) प्रक्रियेसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्यानं सभागृहात तणाव निर्माण झाला होता.

गेल्या 14 वर्षांचा विक्रम मोडला, मुंबईत मार्च महिन्यात तब्बल 15 हजारहून अधिक प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन

महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन आणि स्टँप विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 15,516 हून अधिक प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती समोर येत आहेत. हा मागील 14 वर्षांमधील मार्च महिन्यातला हा विक्रम असल्याची चर्चा आहे.यावरुन मुंबईतील रिअल इस्टेट सेक्टर सुसाट असल्याचं दिसून येत आहे. तसेच फेब्रुवारी 2026 च्या तुलनेत मार्चमध्ये 19 टक्के रजिस्ट्रेशन वाढ झाली आहे.

अंजनगावमधील आंदोलकांची लक्ष्मण हाकेंनी घेतली भेट

अंजनगावमधील आंदोलकांची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरारी; पोलिसांकडून लूक आऊटची नोटीस

अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हे गेल्या दोन दिवसांपासून फरारी आहे. शिर्डी आणि एसआयटीची पोलिस पथकं फरार कल्पना खरातच्या मागावर आहेत. कल्पना खरातचा मोबाईलही नॉट रिचेबल आहे, त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एसआयटीचं पथक खरातच्या घरी गेले होते, त्या वेळी ती फरार होती, त्यामुळे मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. शिर्डीतील जमीन गैरव्यहारप्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला आहे.

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भोरमधील नुकसानीची केली पाहणी

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आंबा, विविध बागा आणि शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

भाजप मंत्र्यांच्या कार्यालयातून पैसे घेऊन विधानभवनाच्या बोगस पासचे वाटप

विधानभवन बोगस पास प्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयातून बोगस पास दिल्याचे पुढे आले आहे. बोगस पास देण्यासाठी आकाश फुंडकर यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी १० हजार घेतल्याचे सांगितले जात आहे.

महिला कैद्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची तुरुंगात रवानगी

तुरुंगातील महिला कैद्याला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. तुला दहा हजार रुपये देतो, असे सांगून पोलिस अधिकारी राजेश जाधव याने महिला कैद्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

'ठाकरेंनी, हनुमान चालीसाचे घरात पठण करावे, येथे येऊन हनुमानजींचे दर्शन घ्यावे' : माजी खासदार नवनीत राणांनी सुनावले

नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचे धार्मिक आणि राजकीय महत्त्व सांगताना श्रद्धा आणि भक्तीने अडथळे पार करता येतात, असा टोला ठाकरेंना लगावला आहे. तसेच देवाच्या घरी कोणी मोठं किंवा कोणीही लहान नसतं. कोणाही येण्यासाठी निमंत्रणही द्यायचं नसतं. देवाच्या घरी ज्याने त्याने इच्छेनं गेलं पाहिजे. पण त्यांनी जेव्हा हनुमान चालीसाला विरोध केला तेव्हा त्यांच्यापासून लोक दूर गेले. त्यांचे 40 लोक गेले. आताही जे त्यांचे उरले सुरले आहेत. ते देखील बाहेर जाण्याच्या माणसिकतेत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी आता हनुमान चालीसाचे घरात पठण करावे, येथे येऊन हनुमानजींचे दर्शन घ्यावे असे म्हटलं आहे.

कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टींची नवी मुंबई बैठक

कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर असलेल्या व्यापाऱ्यांनी व्याजाने दिलेले ॲडव्हान्सेस, बाजार समितीमधील सौदे , वाहतूक व्यवस्था व सुविधा यासह विविध समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आज नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) सभागृहात मा. खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.

नाशिक जिल्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाज नुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला, निफाड परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे उन्हाळी हंगामातील गहू, कांदा तसेच इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या पावसाचा फटका बाजारपेठेलाही बसताना दिसत आहे.

अवकाळी पावसाचा तडाखा; मक्याचे पीक जमीनदोस्त..

आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मावळातील देहू परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन एकर क्षेत्रावरील मक्याचे पीक पूर्णपणे खराब झाले असून, कापणीच्या टप्प्यावर आलेले उभे पीक आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ पिकांनाच नाही, तर पशुधनालाही बसला आहे. शेतात साठवून ठेवलेला हजारो रुपयांचा कडबा पावसात भिजून खराब झाला आहे. परिणामी, जनावरांसाठी बाहेरून कडबा खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मालेगाव महापालिकेच्या महासभेत SIR मुद्द्यावरून नगरसेवक आमनेसामने

मालेगाव महापालिकेच्या महासभेत SIR मुद्द्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. या विषयावरून इस्लाम पक्ष आणि MIM नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की काही नगरसेवक एकमेकांवर धावून गेले आणि धक्काबुक्की झाली. या गोंधळामुळे काही काळ महासभेचे कामकाज ठप्प झाले.

अंबादास दानवेंवर पुन्हा एकदा पक्षातील नेत्याकडून आर्थिक व्यवहाराचे आरोप!

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील दोन सदस्यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपाला मदत करण्याच्या हेतूने आर्थिक व्यवहार करत आम्हाला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता सभापती पदाच्या निवडणुकीपासून वंचित ठेवल्याचा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर या सदस्याने केला आहे.

'...काही देऊन तरी जावे', चव्हाण यांच्या टोमण्याला आमदार हेमंत पाटील यांचा जोरदार पलटवार

नांदेडला स्वागत आहे पण आले तर काही देऊन तरी जावे अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. चव्हाणांच्या या टिकेला सेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. चव्हानांनी 72 वर्षात फक्त आलेला निधी फस्त केलाय, परत काही फस्त करायचं होतं म्हणून मागणी केली का असा टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांची पक्षात घडणाऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने समाज माध्यमांवर पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनेत्रा पवार विरुद्ध तटकरे-पटेल असा संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांनीही जोर धरला. पटेल-तटकरे यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षात नवे वादळ उभा राहण्याची दाट शक्यता व्यक्त होत असतानाच सुनेत्रा पवार यांचे पुत्र, राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांनी पक्षात घडणाऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. तटकरे-पटेलांना हटविल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे पवार यांनी म्हटले आहे

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना मोठा झटका दिला आहे. आम आदमी पार्टीने मोठा फेरबदल केला आहे. खासदार राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरुन हटवलं आहे.

Pune News: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना मातृशोक सहन करावा लागला आहे. त्यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे निधन झाले आहे.

Pune : खरातनंतर पुणे जिल्ह्यात आणखी एक भोंदू बाबा सापडला

अशोक खरात प्रकरण ताजे असताना पुणे जिल्ह्यात आणखी एक भोंदूबाबा समोर आला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीत या भोंदूबाबानं अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलंय. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं उघडकीस आले आहे.

Manmad LPG Shortage मनमाडमध्ये गो -गॅस LPG पंप बंद

मनमाडमध्ये व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता एलपीजी गॅसची देखील मोठया प्रमाणात टंचाई निर्माण झालीये. शहरातील एकमेव गो -गॅस LPG पंप 4 दिवसांपासून बंदये. यामुळे शहरातील वाहन धाराकांची मोठी गैससोय झालीये. यांचा सर्वाधिक फटका शहरातील रिक्षा चालक, स्कूल बसेसला बसला असून, वाहकतुकीवर मोठा परिणाम झालाय.

Ashok Kharat case भोंदू अशोक खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करत सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने खरातला पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे. खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ashok Kharat case व्हीसीद्वारे खरातची सुनावणी सुरु

नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी सुरु आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्यात आले आहे. व्हीसीद्वारेच सुनावणी सुरु आहे. अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर गुन्ह्यात आज सुनावणी होत आहे. एका घटस्फोटित पीडित महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली होती.

खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; अजय मिसरांच्या नकारानंतर असीम सरोदे पुढे

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांना विनंती करण्यात आली होती, मात्र कामाच्या ताणामुळे त्यांनी नकार दिला. यानंतर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणी सुनावणी

नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर गुन्ह्यात आज सुनावणी होणार आहे. एका घटस्फोटित पीडित महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात यासंबंधी दिली होती तक्रार.

भोंदूबाबा अशोक खरातच्या केबिनमध्ये काय काय मिळालं

भोंदूबाबा अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातने ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणाऱ्या औषधे, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची माहिती समोर आली आहे. 

दोन दिवसापासून बेपत्ता आहे अशोक खरातची बायको

अशोक खरातची बायको कल्पना खरातचा गेल्या 2 दिवसांपासून पोलीस यंत्रणांना शोध लागत नाहीये. फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध SIT आणि शिर्डी पोलीस घेत आहेत. कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित होत आहे.

अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

भोंदू अशोक खरातला काल पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याची SIT ने मागणी केली होती. तर याच दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

पुणे शहरासह जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

आखाती युद्धात अमेरिकेचा विजय - ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धा संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. "इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला करताना ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असून त्यांचे सर्व मोठे नेते मारले गेले आहेत. इराणचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली असून आपण युद्ध संपवण्याच्या खूप जवळ आहे. कधीही मिळवला नाही असा विजय आम्ही मिळवला आहे. आम्ही आमची उद्दीष्ट आम्ही पूर्ण केली असून इराणला अण्वस्त्रसज्ज देश होण्यापासून रोखल्याचा मला अभिमान आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.

British PM Starmer: तेल वाहतुकीचा मार्ग 'हॉर्मुझ' पुन्हा सुरु करण्यासाठी ब्रिटनचा पुढाकार

इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बुधवारी हे स्पष्ट केलं की, ब्रिटन अमेरिका-इराण युद्धात सहभागी होणार नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी हे ठळकपणे सांगितलं की, हे आमचं युद्ध नाही, त्यामुळं यामध्ये सामिल हे राष्ट्रहितामध्ये नाही. त्याचबरोबर ज्या मार्गानं पश्चिम आशियात इराणमधून कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते तो हॉर्मुझ सामुद्रधुनिका मार्ग मोकळा करण्यासाठी ३५ देशांची बैठक बोलावली आहे.

रॉकेलच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

आखाती युद्धामुळे रॉकेलच्या (केरोसीन) कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे सरकारने रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आता पुरवठा दाराच्या कमिशनमध्येही दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

भोंदू ऋषिकेश वैद्यने महिलेला अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं उघडकीस

वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यने संबंधित महिलेला वारंवार अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील महिलेच्या मोबाईलमधील स्क्रीनशॉटही समोर आले आहेत.

गोकुळ दूध संघाची चौकशी होणार

गोकुळ दूध संघाची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. मात्र, अशातच या संस्थेची चौकशी होणार असून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून हे चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com