Deepak Kesarkar News:अशोक खरात प्रकरणात अनेक मंत्री, नेत्यांची नावे समोर येत आहेत. खरात याला पाठीशी घातल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आला होता. चाकणकर यांच्यासोबतच अशोक खरातसोबत माजी मंत्री, आमदार दीपक केसकर यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होते. त्यांनीच एकनाथ शिंदेंची भेट खरातशी घालून दिल्याचे म्हटले होते.
या सगळ्या प्रकरणावर दीपक केसरकर यांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले, त्यांनी कित्येक लोक भेटून गेले. जवळपास 39 आमदार भेटून गेले, पण माझच नाव का? हा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला येवढं माहिती असू शकत नाही. मी त्यांच्या संपर्कात नव्हते. फक्त एकाच मी ईशान्येश्वरमध्ये पूजा केली आहे. या व्यक्तिरक्त मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केली नाही.
मी शिर्डीला जात होतो. रस्त्यात शंकराचे मंदिरात जायचे होते म्हणून ईशान्येश्वराच्या मंदिरात गेलो. तेथेच माझी खरातशी ओळख झाली. मात्र, या पलिकडे आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती नव्हते. माझ्यासोबत पोलिस देखील असायचे. त्यांना जर या विषयी माहिती असते तर त्यांनी देखील मला सांगितले असते.
ओळख आहे माझ्या त्याच्या चुकीच्या कृतीत माझा सहभाग आहे, असे नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा जर एखादा फोन गेला असेल तर मी दोषी असेल. पण त्यांच्याकडून जर चुकीचं कृत्य घडलं असेल तर त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, असे देखील केसरकर यांनी सांगितले.
दीपक केसकर म्हणाले, मी मंत्री असताना त्यांचा माझ्या विभागाशी काहीच संबंध नव्हता. माझी ईशान्येश्वर मंदिराच्या संदर्भात त्यांची ओळख झाली आणि ईशान्येश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. म्हणूनच मी तेथे गेलो होतो. स्वतः मुख्यमंत्री, अनेक मंत्री तेथे येऊन गेले. त्यांना देखील या गोष्टीची सुतराम माहिती असती तर ते देखील आणि मी देखील तेथे गेलोच नसतो. ना त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवला असता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.