Mumbai News, 22 Mar : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातची पाद्यपूजा केल्याने रुपाली चाकणकरांना आपल्या राज्य महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे खरातसोबतचे फोटो चाकणकरांसाठी मोठी अडचणीचे ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.
मात्र, याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक नेत्यांचे आणि मंत्र्यांचे फोटो आता समोर येत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पक्षातील नेते दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. या फोटोवरूनही विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.
अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत एकनाथ शिंदेंबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरातनेच दाखवल्याचं असं राऊतांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
तर माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशी व्हायला पाहिजे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. विनायक राऊत म्हणाले, "अशोक खरात याच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकरांनी एकनाथ शिंदेंना दाखवली आणि खरातने शिंदेना गुवाहाटीची वाट दाखवली. खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्री मंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील."
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांची चौकशी करून त्याना काढून टाकावे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता खरातची चौकशी सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवणाऱ्या महाराष्ट्रातले संविधानात्मक पदावरच्या नेता त्यांचे पाय धूत होता ही शरमेची बाब आहे.
खरातच्या व्हिडीओची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्याचा घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यात ज्या ज्या नेत्यांची नावे येतील त्यांच्याकडून खरातचा घात हाऊ शकतो. त्याच्या जीवाचे रक्षण करणे हे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कर्तव्य आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता खरात प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अंगलट आल्यानंतर आता दीपक केसरकर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.