devendra fadnavis, ashok kharat Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra fadnavis : नाशिकमध्ये CM फडणवीसांची मोठी घोषणा; भोंदूबाबा खरातच्या चौकशीसाठी आणखी एका तपास यंत्रणेची एन्ट्री! बड्या नेत्यांची नावे येणार समोर?

Political News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे दररोज नवे कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जात असल्याने त्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Nashik News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे दररोज नवे कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जात असल्याने त्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता नाशिक दौऱ्यावर असलेल्या सीएम फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक तपास यंत्रणेची आता एंट्री होणार आहे. कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहार आता ED च्या रडारवर आले असून त्यामुळे अशोक खरातची ईडी चौकशी करण्याची घोषणा सीएम फडणवीस यांनी केली आहे.

नाशिक येथील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सीएम फडणवीस (Devendra fadnavis) यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नाची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणी विविध खुलासे केले आहेत. या प्रकरणात राजकारण करू नका असा सल्ला देतानाच त्यांनी अशोक खरात याचा सीडीआर कोणी लीक केला याचा तपास करणार असल्याचे स्पष्ट केले. खरातच्या घाणेरड्या कृत्याला पाठीशी घालणाऱ्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी एसआयटी तपास सुरू असून तो रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. दरम्यान, ईडीने या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशी केली जाणार आहे.

सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणाला नाही. जे या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशा तपास यंत्रणांनाच तो सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सीडीआर कसा बाहेर आला, तो कुठून मिळवला याची चौकशी केली जाणार आहे. अशोक खरात प्रकरणात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कॊणालाही सोडणार नाही. त्यासोबतच अंजली दमानियांकडे (Anjali Damaniya) खरातचा सीडीआर कशा प्रकारे आला याची चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सीएम फडणवीस यांनी केलेल्या ईडी चौकशीच्या घोषणेने भोंदू बाबा अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. अनेकांना घाम फोडणारी आणि त्रस्त करणाऱ्या ईडीचा, सक्तवसुली संचालनालयाचा ससेमिरा आता खरातच्या मागे लागण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी अनेक संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार रडारवर आले आहेत. हे व्यवहार नेमके कुणाचे आहेत. या व्यवहारात कोण कोण आहेत, याची इत्यंभूत माहिती समोर येणार आहे. त्यामुळे अनेकांची धाबे दणाणली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT