Ashok Kharat : SIT ने अशोक खरातच्या नाड्या आवळल्या, महिलांसोबत गैरकृत्य केलं ते कार्यालय सील, बॅंक खाते गोठावले..

Ashok Kharat’s Nashik Office Sealed : आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. अशोक खरातने ज्या कार्यालयात महिलांसोबत अश्लिल कृत्य केले ते कार्यालय सील करण्यात आलं आहे.
Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat real name controversySarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैगिंक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिष व कॅप्टन अशोक खरातच्या एसआयटीने नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. खरातने कोट्यावधींची माया जमवली असून एसआयटीने त्याच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या कार्यालयात खरात महिलांचे शोषण करायचा ते कार्यालयच एसआयटीने सील केलं आहे.

एसआयटीने गुरुवारी अशोक खरात याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या ओकस प्रॉपर्टी अॅण्ड डेव्हलपर्स या कार्यालयाची झाडाझडती घेतली. याच कार्यालयात अशोक खरात महिलांसोबत कुकर्म करत होता. हे कार्यालयच एसआयटीने सील केलं.

SIT पथकाने झाडाझडती दरम्यान कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या ठिकाणी विविध फाईल्स, नोंदी आणि इतर साहित्य आढळून आल्याची माहिती आहे. त्या माध्यमातून याप्रकरणात मोठे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय अधिकृतपणे सील करण्यात आले आहे. त्यामुळे या कारवाईनंतर खरातच्या कारभाराचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat case action : भोंदूबाबा खरात प्रकरणात सीएम फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले,'60 दिवसांच्या आतच....'

दरम्यान खरातच्या आर्थिक व्यवहारांकडे तपास पथकाने लक्ष केंद्रित केले असून खरातच्या शिवनिका संस्थानचे बॅंक खाते गोठावण्यात आले आहे. खरातसह त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती काढली जात आहे. खरातच्या कुटुंबियांच्या नावे एकुण किती संपत्ती आहे. तसेच जमीन, प्लॉट, फ्लॅट, कार व इतर साधने अशा विविध मालमत्तांची चौकशी सुरु असून यातून खरातची कुंडलीच बाहेर येणार आहे.

दरम्यान अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नोंदणी विभागाकडून खरातच्या राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल व प्रॉपर्टी उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat real name controversy
Ashok Kharat : तर तुमचे नामोनिशान नष्ट करू.. भोंदू खरातच्या माणसांनी अंनिस कार्यकर्त्यांना दिल्या होत्या धमक्या

दरम्यान खरात विरोधात अनेक तक्रारी पुढे येत आहेत. आतापर्यंत त्याच्यावर 8 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच कोर्टात सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी अशोक खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला होता. त्याप्रकरणी देखील तपास सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com