Nashik News: नाशिकमधील गेले चार महिन्यांपासून राज्यात खळबळ उडवून दिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ,अंधश्रद्धा,तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तीची भीती दाखवून खरातने महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होतं. जवळपास 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी खरातला अटक केली आहे. आता याप्रकरणी खरातसह राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
अशोक खरात प्रकरणात आता विशेष सरकारी वकील म्हणून आता गाजलेले गंभीर खटले चालवणारे,गुन्हेगारांना धडकी भरवणाऱ्या ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री झाली आहे. ते या प्रकरणात सरकारची बाजू मांडणार आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
राज्य सरकारकडून यापूर्वीही अनेक हाय-प्रोफाइल खटल्यात उज्जवल निकमांची कायदेशीर लढाईसाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आणि खरात प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राजकारण,प्रशासन हादरवणाऱ्या निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत होती.
राज्य सरकारने अखेर बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. अशोक खरात प्रकरणामुळे निकम यांच्या कारकीर्दीत आणखी एका हायप्रोफाईल खटल्याची नोंद झाली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. तसेच तो महिलांना गुंगीचे औषध देऊन आणि प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेढा किंवा पाण्यातून अंमली पदार्थ देऊन महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचेही गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पीडित महिलांच्या तक्रारीनंतर खरातला अटक आहे.
या प्रकरणी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्यावाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सातपुते यांच्या'एसआयटी'ने या प्रकरणी सखोल तपास सुरू असून आरोपी खरातचं कार्यालय आणि फार्म हाऊस,बॅंक खाती यांची झाडाझडती घेत कसून तपास सुरू केला आहे. एसआयटी पथकाच्या तपासात आत्तापर्यंत अशोक खरात,त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरोधात भक्कम पुरावे हाती लागले आहेत.
अशोक खरात प्रकरणाची जबाबदारी सरकारी वकील उज्जवल निकम यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर आणखी काही नेतेमंडळी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचे नावं समोर येण्याची शक्यता आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या महिलांचं लैंगिक शोषण,कोट्यवधी रुपयांची फसवणूक,जमीनगैरव्यवहार यांसह अनेक गुन्ह्यांमध्ये कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. या प्रकरणात एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक बाब समोर येत आहे.
एसआयटीनं भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांकडे आत्तापर्यंत तब्बल 30 जणांनी त्याच्याविरोधात साक्ष नोंदवली असून खरातने योनी पूजेच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती.
याचदरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांना हाती लागले आहेत. हेच अशोक खरातचे केबिनमधील व्हिडीओ हे महाराष्ट्र राज्यच नव्हे तर इतर 21 राज्ये, काही केंद्रशासित प्रदेश यांसह श्रीलंका, नायजेरिया, यूएई यांसारख्या देशांतही व्हायरल झाल्याची हादरवणारी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांना मिळून आले आहेत. यावरून खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.