Ashok Kharat
अशोक खरात याच्या दाव्यानुसार, ते मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत. 22 वर्षे सेवेत असताना त्यांनी अनेक देशांची सफर केली आहे. निवृत्तीनंतर त्याने ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केला. तसेच ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचेही तो सांगतो. तो स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचे तज्ज्ञ मानतो. पण याच खरातच्या हातात बेड्या घालण्यात आल्या आहेत. 35 वर्षीय महिलेच्या आरोपावरून खरातला बलात्कार आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत अटक केली आहे.