Crime News: नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या कॅप्टन अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वात मोठी धक्कादायक अपडेट समोर आली आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष व स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ खरातच्या अटकेनंतर या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पण आता याचदरम्यान,गैरकृत्यांचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली आहे.
राजकीय नेत्यांपासून ते मोठमोठ्या सेलेब्रिटींमध्ये क्रेझ असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या दुष्कृत्याचा खरा मुख्य सूत्रधार कॅप्टन खरातचा खास मर्जीतील ऑफिसबॉय संशयित नीरज जाधवच असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. खरातने महिलांवर अत्याचार केले. त्याचंच भांडवल करत खंडणी उकळण्याच्या धमक्या देत 58 महिलांची लाज विकण्याचा डाव नीरजनं रचल्याचं समोर आलं होतं. आता याप्रकरणी पोलिसांनी नीरजला बेड्या ठोकल्यानंतर खरातसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अशोक खरातच्या मर्जीतील ऑफिसबॉय नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2026 ला एका महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. अखेरीस कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. जाधव याने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण आला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
नीरज जाधवने पीडित महिलेला कॅप्टन खरातच्या ऑफिसमधील आक्षेपार्ह व्हिडीओचे स्क्रीनशॉट पाठवत धमकावल्याचं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. पण शिर्डी पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेतली नाही. आता ऑफिस बॉय नीरज जाधव पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या प्रकरणात धक्क्दायक बाब समोर येण्याची शक्यता आहे.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात अशोक खरातची महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी दोन तास कसून चौकशी केली होती. अशोक खरातने त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. याप्रकरणाला आता धक्कादायक वळण लागले असून अशोक खरात याच्या मर्जीतीलऑफिस बॉय संशयित नीरज जाधव हाच या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं आहे.
नीरज जाधवने डिसेंबर 2025 मध्ये अशोक खरातच्या कार्यालयात महिलांवर झालेल्या बलात्काराचे, अत्याचाराचे 58 सीसीटीव्ही फुटेजेस स्वत:च्या ताब्यात घेतली होती. त्याच व्हिडीओ क्लिप्सच्या माध्यमातून त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी, या आक्षेपार्ह क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मात्र, अशोक खरातने नीरजच्या कोणत्याही धमक्यांना भीक न घालता त्याला जे करायचं ते कर असं म्हणत थेट उडवून लावलं.यानंतर नीरज जाधवने पीडित महिलांनाच जाळ्यात ओढत त्यांनाच फूस लावण्याचा प्रयत्न केला. यात त्यानं थेट शिर्डीतील एका 24 वर्षांच्या विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या व्हॉट्सॲपवर पाठवले आणि तिला धमकावलं. यानंतर हादरलेल्या पीडितीने या प्रकाराची खरातला माहिती दिली. यावर खरातनं त्या महिलेला पोलिसात तक्रार देण्यास सांगितलं.
यानंतरही अशोक खरात आपल्याला जुमानत नसल्याचं लक्षात येताच नीरजनं त्याचा पुढचा डाव टाकला तो सिडको येथील 28 वर्षीय विवाहितेवर. त्यावेळी नीरजनं त्या विवाहितेचे तेच व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठवला. ते पाहून मेहुण्याने पीडितेला धीर दिला आणि फिर्याद नोंदवण्यासाठी प्रोत्साहन दिलं, यानंतर पीडित तरूणीनं पोलिस स्टेशन गाठत अशोक खरातविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आणि खरातच्या काळ्या कृत्यांची भांडाफोड झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.