Ashok Kharat Case : खरातच्या आदेशाने अघोरी पूजा अन् अपघातादिवशी अजितदादांना कारने जाण्याचा सल्ला; फोटो शेअर करत मिटकरींचा खळबळजनक दावा

Ashok Kharat and Ajit Pawar death connection : 'ह्या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला.
Ashok Kharat and Ajit Pawar death connection
Police arrest Ashok Kharat amid allegations of rape and links to alleged aghori rituals connected to Ajit Pawar controversy.Ashok Kharat and Ajit Pawar death connection
Published on
Updated on

Mumbai News, 20 Mar : दैवी शक्ती आणि ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याच्यार केल्या प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण खरातसोबत अनेक नेत्यांचे जवळचे संबंध असल्याचं समोर येत आहे.

अशातच आता अशोक खरातच्या आश्रमात ज्या अघोरी पूजा करायचा त्याचं कनेक्शन थेट दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूशी जोडलं जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत खळबळजनक दावा केला आहे. मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केल्याचा दावा केला आहे. तर ही अघोरी पूजा अशोक खरातचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी करत होते.

आणि खरातच्या आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल असा दावा मिटकरींनी केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये २०२५ सालच्या कॅलेंडरमधील काही फोटो पोस्ट करत लिहिलं की, 'ह्या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या.

Ashok Kharat and Ajit Pawar death connection
Ashok Kharat Controversy : "अशोक खरातची भाची चाकणकरांच्या घरात, त्यांना सर्व गुन्ह्यांची माहिती, फरार होण्याआधीच अटक करा..."

याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या? शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोतांडाना थारा देत नव्हते.

मात्र या प्रकरणात अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कारने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल.

Ashok Kharat and Ajit Pawar death connection
Ashok Kharat Case : भाजपनेही रुपाली चाकणकरांची साथ सोडली; अडचणीत सापडलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांची खुर्ची गेल्यात जमा

गुजोबावी धुके की धोका? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतय.', असा गंभीर आरोप मिटकरींनी केला आहे. तसंत या पोस्टमध्ये त्यांनी सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला झालेल्या पूजेचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता अशोक खरातच्या आश्रमाचं कनेक्शन खरंच अजित पवारांच्या मृत्यूशी आहे का? याबाबातच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com