Ashok Kharat case  Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Case : अत्याचार झालेल्या महिलांचा शोध सुरू; अशोक खरात विरोधात अवघ्या तीन तक्रारी!

Ashok Kharat Nashik Police : अशोक खरात याच्या विरोधात अवघ्या तीन तक्रारी दाखल आहेत. अत्याचार झालेल्या महिलांची माहिती संकलीत करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

Roshan More

Nashik Police : अशोक खरात विरोधात एकाच महिलेनी अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. तर, इतर दोन तक्रारी फसवणूकीच्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जे पेन ड्राईव्ह जप्त केले आहे त्यामध्ये 58 व्हिडिओ असून त्यामध्ये त्याने अनेक महिलांशी श्रद्धेच्या नावाखाली अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

आमदार चित्रा वाघ यांनी अत्याचार झालेल्या महिलांनी पुढे येऊन याबाबत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. आता पोलिसांनी देखील अत्याचार झालेल्या महिलांची ओळख पटवण्याची सुरुवात केल्याची माहिती आहे. पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या अन्य महिलांची नावे संकलित करण्याचे काम पोलिस करीत आहेत.

अशोक खरात याच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयरमधून त्याची लैंगिक शोषणाची मोडस ऑपरेंडी उघड झाली आहे. तो पुजेच्या नावाखाली महिलांच्या डोक्यावर तांब्या द्यायचा आणि त्यानंतर "मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा", असे पुटपुटायचा. तसेच महिलेला तो पेढा आणि कवडवट, खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. यामधून गुंगीचे औषध देत अत्याचार करायचा. त्यापूर्वी महिलेला गायत्री मंत्र म्हणायला लावायचा.

तक्रार करायला पुढे या...

भोंदू बाबा अशोक खरात विरोधात तक्रार करायला पुढे या.फसवणूक झाली असेल तर अजिबात घाबरू नका. देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असे आवाहन आमदार चित्रा वाघ यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT