Ashok Kharat News: खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी, SITच्या संशयाची सुई आता राजकीय नेत्यांकडे

Ashok Kharat Case: SIT Inquiry Deepak Londhe: खरात आणि त्याच्या कार्यालयातील ऑफिस बॉय नीरज जाधव यांच्या मुसक्या आवळल्यानंतर एसआयटीने आता या प्रकरणात राजकीय धागेदोरे काय आहे, हे पाहण्यास सुरवात केली आहे.
Ashok Kharat case
Ashok Kharat case Sarkarnama
Published on
Updated on

Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सूपूर्त केला आहे.

या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहे. खरात आणि त्याच्या कार्यालयातील ऑफिस बॉय नीरज जाधव यांच्या मुसक्या आवळल्यानंतर एसआयटीने आता या प्रकरणात राजकीय धागेदोरे काय आहे, हे पाहण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. लोंढे हा सिन्नरमध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसायात सक्रिय होता. लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार असल्याचे प्रथमदर्शी दिसते.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्या दिल्यानंतर विरोधी पक्ष त्यावर समाधानी नसून चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करा, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली आहे.काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली.

Ashok Kharat case
Ashok Kharat case: देवाभाऊ, एकनाथ शिंदेंचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का? सुषमा अंधारे संतापल्या

'राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद, चूक झाली अस त्यांना वाटत नाही, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Ashok Kharat case
FASTag News: 1 एप्रिलपासून फास्टॅग महागणार; नवा पास कसा मिळवायचा? जाणून घ्या प्रक्रिया

‘इंटरनेट केबल टूल’ने उपचार

अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार केल्याचा अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून तो उपचार करीत असे. उपचाराच्या नावाखाली भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. शोक खरातने मुलीच्या पोटावर ‘इंटरनेट केबल टूल’ने उपचाराचा बनाव केल्याचे दिसते. महिलेसमोरच अल्पवयीन मुलीला तिचा शर्ट वर करण्यास सांगून पोटावर केबल टूल फिरवत उपचाराचा बनाव त्याने केला आहे. अंधश्रद्धा आणि फसवणुकीबाबत त्यांच्यावर आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com