Pune News : भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच अनेक नेतेमंडळींचे लागेबांधे या प्रकरणाशी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अडचणी वाढत आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
त्यातच समता पतसंस्था प्रकरणाचे धागेदोरे आता चाकणकर यांच्या कुटुंबापर्यंत पोहचल्याने त्यांच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता असून त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची एसआयटीकडून चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
भोंदूबाबा अशोक खरात यांनी अनेक महिलांचे आधार व पॅन कार्ड घेऊन त्यांच्या नावे समता पतसंस्थातेत खाते काढले आहेत. त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा असून नॉमिनी म्हणून अनेक खात्यावर खरात याने स्वतःचे नाव लावले आहे. या सर्व प्रकरणाचे धागेदोरे आता थेट राजकीय नेत्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचताना दिसत आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chkankar) यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांच्या नावे या पतसंस्थेत चार खाते आढळून आले आहेत. त्यामुळे या चार खात्याबाबत आता त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.समता पतसंस्थतेत अनेक महिलांच्या नावानी खाते काढण्यात आली आहेत. या संबंधित खात्यातून झालेले व्यवहार आणि ठेवींची सखोल चौकशी तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच या चौकशीमुळे चाकणकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भोंदू अशोक खरात याला गुरुवारी पोलीस नव्याने कोर्टात हजर केले. खरात याच्या विरोधात 11 गुन्हे दाखल आहेत. यातील महत्त्वाच्या गुन्ह्यात खरात याचा तपास होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात खरात याच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. महिला अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्यात विशेष तपास पथक गुरुवारी त्याचा नव्याने ताबा घेऊन तपास करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.