Ashok Kharat Crime: खरात 'कनेक्शन' अंगलट,राजीनाम्यासाठी दबाव; चाकणकरांनी घेतली थेट 'डीजीपी' दातेंची भेट, दिली 'ही' मोठी अपडेट

NCP Rupali Chakankar Resign: राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर फरार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. रुपाली पाटील यांनी फेसबूकवर 'राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारूपाली चाकणकर फरार.बजाव टाली.', अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही पोस्ट उपहासात्मक असल्याची चर्चा आहे.
Rupali Chakankar Ashok Kharat Rupali Patil Thombare Sushma Andhare
Rupali Chakankar Ashok Kharat Rupali Patil Thombare Sushma Andhare Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik Crime News: कॅप्टन व स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणानं नाशिकसह संपूर्ण राज्य हादरलं. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही खरात सोबतचे काही फोटो व्हायरल झाल्यानं आणि त्यासंबंधित एका संस्थेच्या ट्रस्टशी नाव जोडले गेल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली होती. तसेच त्यांच्यावर विरोधकांसह त्यांच्यात पक्षातील महिला नेत्यांकडून गंभीर दावे करण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्यासाठीही मोठा दबाव सरकारवर आणला जात आहे. आता याचदरम्यान, एक मोठी घडामोड समोर आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी एकीकडे अशोक खरात प्रकरण तापलेलं असतानाच राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्यावर होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

या भेटीनंतर चाकणकरांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपींवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितल्याचं चाकणकरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष व स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ खरातच्या अटकेनंतर या प्रकरणात दिवसागणिक खळबळ उडवून देणारे बाबी समोर येत आहे. महत्त्वाची घडामोड म्हणजे खरातच्या गैरकृत्यांचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवलाही पोलिसांनी अटक केली आहे.

Rupali Chakankar Ashok Kharat Rupali Patil Thombare Sushma Andhare
Ashok Kharat Case: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण; 58 महिलांची लाज विकणाऱ्या 'मास्टर माईंड'ला पोलिसांनी केली अटक

अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

ते म्हणाले, अशोक खरात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्याच्या सोबत सोबत या कामात जे राहिले असेल तर निश्चित त्यांची नावे चौकशीत समोर येतील त्यांच्यावरही तातडीने आणि सक्तीने कारवाई केली गेली पाहिजे.'काही राजकीय नेत्यांचं नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आहे. नक्की आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि तुम्हाला या एक दोन दिवसात ते दिसेल.., असे म्हणत पटेल यांनी चाकणकरांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Rupali Chakankar Ashok Kharat Rupali Patil Thombare Sushma Andhare
Kolhapur News: 70 कोटींच्या वसुलीसाठी थेट कोल्हापूरचा पाणीपुरवठाच तोडला, संतापलेल्या पालिकेने विखे पाटलांच्या 'जलसंपदा'ला ठोकलं टाळं

चाकणकर फरार...

अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे. खरात याच्यासोबत चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या खरातच्या संस्थेवर संचालक देखील असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर फरार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर फरार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. रुपाली पाटील यांनी फेसबूकवर 'राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारूपाली चाकणकर फरार.बजाव टाली.', अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही पोस्ट उपहासात्मक असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com