Pune News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा पॊलिसांकडून कसून तपास केला जात आहे. अशोक खरातच्या संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच आता त्याची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. त्यामुळे दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे पोलीस त्याचे सर्व जुने रेकॉर्ड तपासत आहेत. पोलीस शोध घेत असताना खरातचे 46 वर्ष जुने प्रकरण आता समोर आले आहे. 20 वर्षाचा असतानाच 1980 मध्ये भोंदूबाबाने कुटुंबातील महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे पुढे आले आहे. त्यावेळी गावकऱ्यांनी चोप दिल्याने तो रात्रीतूनच गावातून फरार झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी गावात आला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे
भोंदूबाबा खरात याच्या विरोधात दहा महिलांनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यासोबतच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणाची एसआयटीकडून (SIT) चौकशी केली जात आहे. त्यामुळे एकीकडे खरात याच्या अडचणीत भर पडली असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच एसआयटीच्या पथकाकडून कसून चौकशी केली जात असल्याने खरातच्या वाईट कृत्यांची यादी दिवसागणिक मोठी होत आहे.
वयाच्या 20 व्या वर्षीच अशोक खरातने नातेवाईक महिलेसोबत नको ते कृत्य केले होते. हे प्रकरण 46 वर्ष जुने आहे. 1980 मध्ये जेव्हा अशोक खरात फक्त 20 वर्षांचा होता. तेव्हा त्याने महिला नातेवाईकासोबत घाणेरडे कृत्य केले होते. त्यानंतर तो 15 वर्ष गावातून फरार झाला होता. पोलीस त्याचे सर्व जुने रेकॉर्ड तपासत असताना संबंधित प्रकरण आता चर्चेत आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'अशोक उर्फ लक्ष्मण खरात 20 वर्षांचा होता. त्यावेळी त्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एका महिला नातेवाईकाला जादूटोण्याच्या जाळ्यात ओढले होते. ही महिला त्याची दूरची नातेवाईक होती. महिलेला मुले होत नव्हते. त्याचवेळी, खरातने विधींच्या नावाखाली तिचा गैरफायदा घेतला आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खरातने नातेवाईक महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गावाला कळाला. त्यावेळी या प्रकारामुळे गावातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. त्यावेळी गावातील लोकांनी त्याला मारलेही होते. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत खरातने रात्रीतून गाव सोडले होते. त्यानंतर तब्बल 15 वर्ष तो कुठे होता, कोणात्या संरक्षणात होता आणि काय करत होता, हे एक मोठे रहस्य आहे.
लक्ष्मणच झाला अशोक खरात
या लैंगिक शोषणाच्या या घटनेनंतर जवळपास 15 वर्ष बेपत्ता राहिल्यानंतर, तो अचानक त्याच्या मूळ गावी, काहंदलवाडी येथे परतला. त्यानंतर त्याने स्वतःचे नाव बदलून अशोक खरात असे ठेवले होते. भोंदूबाबा 15 वर्षांच्या अज्ञातवासात नक्की काय करत होता? याचा शोध पोलीसांकडून घेतला जात आहे. त्यामुळे अशोक खरातच्या भूतकाळातील काळे पैलू आता उघड होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.