Ashok Kharat case investigation update: भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या कथित महिला अत्याचार प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जात आहे. तशी तशी धक्कादायक माहिती उघड होत आहे. हे प्रकरण सुरुवातीला केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित असल्याचं वाटणारं खरातांचं जाळं राज्याबाहेरही मोठ्या प्रमाणावर पसरल्याचं समोर येत आहे. त्याचं संपर्क इतर राज्यांतील बड्या नेत्यांसोबतही असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
राजकारण्यांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली तो अनेकांना आकर्षित करत होता. विशेषतः राजकीय क्षेत्रातील काही नेते त्याच्या संपर्कात होते, अशी चर्चा रंगली आहे. हरियाणा आणि राजस्थानसारख्या राज्यांतील काही प्रभावी मंत्री आणि नेते खरातकडे सल्ला घेण्यासाठी येत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या नेत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी खरात विविध पद्धतींचा वापर करत होता, असंही सांगितलं जात आहे. राजकीय यश, निवडणुकीतील विजय आणि पदसिद्धीसाठी तो मार्गदर्शन करत असल्याचा दावा करत होता. त्यामुळे अनेक जण त्याच्याकडे जात होते. केवळ सल्ला देण्यापुरतंच नव्हे, तर त्याच्या ओळखींचं जाळं हळूहळू वाढत गेलं.
तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या संपर्कांच्या माध्यमातून खरातचे संबंध दिल्लीतील राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. देशाच्या विविध भागांतील नेत्यांशी त्याचे संबंध असल्याने तपास अधिक व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, तपास अधिकारी या सगळ्या संपर्कांची सखोल चौकशी करत आहेत. खरातने नेमक्या कोणत्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं, तसेच त्याने कोणकोणाशी संपर्क साधला, याचा तपशील उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.