Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

Ashok Kharat Controversy: अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा समोर आला असून या गुन्ह्यात ऑफिसमधून 58 व्हिडिओ लीक झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
Ashok Kharat case investigation latest news
Ashok Kharat case investigation latest newsSarkarnama
Published on
Updated on

New revelations in Ashok Kharat case: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी, आध्यात्मिक सल्लागार म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन अशोक खरात सध्या महिला अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणामुळे चर्चेत आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. तपासात रोज नवीन माहिती समोर येत आहे.

अशोक खरात याच्या निकटवर्तीय ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव यानेच खरात याचा गेम केला, अशी माहिती तपासात समोर येत आहे. य प्रकरणाचा मास्टर माइंड नीरज जाधव असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

या प्रकरणात ज्या महिलांचे खरात शोषण करीत होता, याची माहिती नीरज जाधव याला मिळाली होती. या आधारावर त्याने खरातला ब्लॅकमेल करण्याचे ठरवले. समाजात 'साधू' म्हणून वावरत असताना तो त्याच्या ऑफिसमध्ये दुष्कृत्य करीत होता. हे पाहून नीरजच्या मनात खरात याला ब्लॅकमेल करण्याचा विचार आला. त्याने प्लॅन आखला. नीरजने डिसेंबर 2025 खरातच्या ऑफिसमधील 58 बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे घेतले होते.

Ashok Kharat case investigation latest news
FASTag Annual Pass: राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार असाल, तर अधिकचे पैसे मोजावे लागणार; टोलच्या दरात मोठी वाढ

नीरज याने या प्रकरणात आपल्या काही मित्रांची मदत घेतली. या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचीही माहिती आहे. खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला.त्याने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकी दिली.

नीरज ने दिलेल्या धमक्यांना न घाबरता खरात याने नीरज याला 'तुला काय करायचं ते कर...' असं सांगितले. त्यानंतर नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, याच ठिकाणी खरात हा जाळ्यात अडकला.

Ashok Kharat case investigation latest news
Narendra Mehta : थेट पंतप्रधान कार्यालयाकडून CM फडणवीसांना भाजप आमदारावर कारवाईचा आदेश; तब्बल 400 कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप

शिर्डीतील 24 वर्षीय विवाहित महिला आणि खरात यांचे याबाबत बोलणं झालं. संबधीत महिलेने नीरज आपल्याला धमकी देत असल्याचे तिने खरातला सांगितले. खरात याने या प्रकरणातून अंग काढत तिला पोलिसाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला.

खरात आपल्या धमक्यांना घाबरणार नाही, हे लक्षात आल्यावर नीरजने दुसरा प्लॅन ऑपरेट केला. नाशिक परिसरातील एका 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या नातेाईकाला पाठविला. अन् याच ठिकाणी खरात जाळ्यात सापडण्यास सुरवात झाली.

Ashok Kharat case investigation latest news
Pune ZP News: पहिल्याच दिवशी ZP विरोधकांची खेळी! सत्ताधारी फिरले 'दारोदारी'

त्या महिलेच्या नातेवाईकाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली. तिला पोलिसाकडे तक्रार करण्यास सांगितले. पिडीत महिलेने त्याचा सल्ला ऐकत पोलिसांकडे तक्रार केली, अन् खरात यांचे बिंग फुटले.

खरात याने महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप होत असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर या प्रकणावरुन टीका करण्यात येत आहे. विरोधकांकडून चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

खरात याच्याकडून पोलिसांनी 58 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केल्याचा दावा करण्यात येत आहे. एका 35 वर्षीय महिलेने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिल्यानंतर खरात याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकून पिस्तूल व संशयास्पद कागदपत्रे पोलिसांन जप्त केली आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. खरात याचा काही राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचे आरोप विरोधक करीत असल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com