Aditya Thackeray News : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एक वक्तव्यामुळे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी तब्बल 500 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली.विशेष म्हणजे ही नोटीस घेऊन ते आपल्या वकिलांसोबत 'मातोश्री'वर गेले. मातोश्री निवास्थानाच्या परिसरात ठाकरेंच्या वकिलाने ही नोटीस स्वीकारली.
दरम्यान, अब्रुनुकसानीचा दावा करणारा व्यक्ती ज्या व्यक्तीवर दावा केला आहे त्याच्या घरी जाऊन नोटीस देऊ शकते का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातूनच दिशाचे वडील हे केवळ स्टंटबाजी करत असून ठाकरेंची बदनामी करण्यासाठी हे करत असल्याची देखील टीका होते आहे. त्यामुळे कायदा नेमकं काय सांगतो? याची चर्चा सुरु झाली आहे.
अॅड.असीम सरोदे यांनी ट्विट करत या विषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या प्रकरणाची नोटीस द्यायला एखादी व्यक्ती स्वतः वकिलांचा फौजफाटा घेऊन कुणाच्या घरी जाते याला काही कायदेशीर आधार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला. महाराष्ट्रातून अनेक जण मला फोनकॉल करून असा प्रश्न विचारीत असल्याने कायदेशीर माहिती देणे आवश्यक आहे.
'क्रिमिनल केस मध्ये प्रत्यक्ष कुणाच्या घरी जाऊन नोटीस सर्व्हिस करण्याची प्रक्रिया नाही. अपवादत्मक परिस्थितीत केवळ न्यायालयाच्या परवानगीने तसे करता येते. सिव्हिल कायदा प्रक्रियेत रूल 9 A नुसार तशी दस्ती समन्स प्रक्रिया न्यायालयाचा आदेश झाल्यावर उपलब्ध आहे.', असे त्यांनी सांगितले.
'दिशा' चुकविली जातेय...
पुढे ते म्हणाले, याप्रकरणी मातोश्रीवर नोटीस घेऊन जाणाऱ्यांना कायदा आदित्य ठाकरेंवर एक हत्यार म्हणून वापरायचा आहे. खरे तर कायदा हे 'साधन' म्हणून वापरायचे असते. 'दिशा' चुकविली जातेय कारण 'हंगामा खडा करना यही मकसद है!'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.