Disha Salian Case : आदित्य ठाकरेंवर दिशा सालियनच्या वडिलांचे गंभीर आरोप, ठाकरेंच्या शिलेदाराचा राणे पिता-पुत्रांवर सवाल; 'मग टॉवर लोकेशन कशाला मागताय?'

Maharashtra Politics news महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिशा सालियन प्रकरणावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Disha Salian death case; Narayan Rane, Nitesh Rane And Aaditya Thackeray
Disha Salian death case; Narayan Rane, Nitesh Rane And Aaditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंचे नावदेखील यात आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सतत टीका करणारे मंत्री नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे ठाकरेंच्या शिलेदाराच्या निशाण्यावर आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी दिशा सालियनच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या वकिलाने जी कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत, त्यावरून राणे पिता-पुत्रांवर सवाल करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सतीश सालियन यांच्या वकिलाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणात न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांत मंत्री नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे नाव आहे. या प्रकरणात राणे पिता-पुत्र प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी चित्रे यांनी सात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी राणे पिता-पुत्र प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते? आत्महत्या होताना किंवा बलात्कार होताना त्यांनी रोखलं का नाही?

महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा, न्यायालयीन कार्यवाहीत सादर करण्यात आलेला दस्तऐवज पाहा. सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजीच्या Exhibit ‘A’ मधील पान क्रमांक २३३, मुद्दा क्रमांक २ मध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे : “कु. दिशा सालियन ह्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून सामूहिक अत्याचार करून नंतर खून करण्यात आल्याबाबतचे आरोप प्रत्यक्षदर्शी साक्षीदार केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व इतर अनेक लोकांनी केले आहेत.”

Disha Salian death case; Narayan Rane, Nitesh Rane And Aaditya Thackeray
Disha Salian Case: आदित्य ठाकरे, अनिल देशमुख अडचणीत? दिशा सालियन प्रकरणी 500 कोटींची मानहानीची नोटीस

याचा सरळ-सरळ अर्थ होतो की, त्या सामूहिक अत्याचाराचे आणि खुनाचे प्रत्यक्षदर्शी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आहेत. तर नितेश राणे सतत म्हणत असतात की, त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांचे टॉवर लोकेशन आहे. जर त्यांच्याकडे लोकेशन असेल, तर न्यायालयाकडे का मागणी करता?

ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी आदित्य ठाकरे मंत्री होते. ते मंत्री होते. याचा अर्थ ते तेथे एकटे गेले नव्हते. त्यांच्याबरोबर पूर्ण सुरक्षा यंत्रणा असणार. मग आदित्य ठाकरेच नाही, तर सर्व दोषी आहेत, असे म्हणावे लागेल? असा सवाल चित्रे यांनी विचारला आहे. आता आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सतीश सालियन यांच्यावरदेखील चित्रे यांनी आरोप केला आहे. त्यांनी, सतीश सालियन यांनी या घटनेबाबत काही आक्षेप नसल्याचे म्हटले होते. त्यांचा याबाबत एक इंटरव्ह्यू सध्या व्हायरल होत आहे. मग आता अचानक असे काय झाले की, सहा वर्षांनंतर त्यांना हे सुचले? त्यांना कोणी आर्थिक रसद पुरवली? असेही प्रश्न चित्रे यांनी उपस्थित केले आहेत.

चित्रे यांनी उपस्थित केलेले सात प्रश्न

१. असा सामूहिक अत्याचार होताना हे प्रत्यक्षदर्शी महाशय शांत राहून अत्याचार का पाहत बसले होते? हस्तक्षेप का केला नाही?

२. खून होताना दिसतोय, तरी मान्यवर प्रत्यक्षदर्शीने ते रोखण्यासाठी काहीच का केलं नाही?

३. सामूहिक अत्याचार पाहिल्यानंतर पीडितेला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती पावले उचलण्यात आली?

४. अशी घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा असल्यास, त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क का साधण्यात आला नाही?

५. असा अत्याचार आणि खून पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसांच्या मानसिक स्थितीवर काहीअंशी परिणाम होतो. मग प्रत्यक्षदर्शी इतके नॉर्मल कसे?

६. असेच यांनी किती सामूहिक अत्याचार आणि खून आयुष्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून पाहिले आहेत?

Disha Salian death case; Narayan Rane, Nitesh Rane And Aaditya Thackeray
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाचा तपास गोल्ड मेडलिस्ट CBI अधिकाऱ्याच्या हाती; कोण आहेत सीमा पाहुजा?

७. असा भयंकर अत्याचार आणि खून प्रत्यक्ष पाहिल्यानंतरही एखादी व्यक्ती पूर्णपणे सामान्यपणे वागत असेल, तर अशा वर्तनाला मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात?

तसेच, चित्रे यांनी असे अनेक गहन प्रश्न महाराष्ट्राला पडणार आहेत. यांची उत्तरे मिळायलाच हवीत. कारण खालील कागदपत्र सोशल मीडिया किंवा मीडिया ट्रायलसाठीचा स्क्रीनशॉट नाही, तर कोर्टात धडधडीत न्यायालयीन पुरावा म्हणून दाखल केलेले कागदपत्र आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com