arvind kejriwal sarkarnama
महाराष्ट्र

AAP Video : महाविकास आघाडीला मोठा दिलासा,'आप'ची निवडणुकीतून माघार?

Roshan More

AAP News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून आम आदमी पक्ष (आप) माघार घेण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्रात आप विधानसभा लढणार नसल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 'आप'ने उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मतविभाजन झाल्याने काँग्रेसला चार ते पाच जागांवर पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'आप'ने माघार घेतल्यास महाविकास आघाडीला दिलासा मिळणार आहे.

'आप'ही इंडिया आघाडीचा घटक आहे. मात्र, लोकसभेला पंजाब वगळता सर्व ठिकाणी आपने काँग्रेसला पाठींबा दिला होता. मात्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत आप-काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही.

महाराष्ट्रात देखील आपच्या स्थानिक नेत्यांकडून महाविकास आघाडीत आपला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीत आपच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम केले होते. विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत तर आप स्वबळावर लढेल, असा इशारा देखील स्थानिक नेत्यांकडून देण्यात आला होता. मात्र, दिल्लीतील निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणूक न लढण्याचा निर्णय आपच्या वरिष्ठ पातळीवर झाल्याची चर्चा आहे.

दिल्लीची विधानसभ निवडणूक कधी?

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेसाठी अवघ्या तीन ते चार महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा तर अतिशी यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे पु्न्हा सत्तेत येण्यासाठी दिल्ली विधानसभेची तयारी आपकडून सुरू करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT