Bapu Bhegade : अजितदादा, मला महामंडळात नव्हे, विधीमंडळात जायचंय!

Bapu Bhegade on ajit Pawar : महामंडळ मला नको मला मावळ मधून विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू साहेब भेगडे यांनी केली आहे.
bapu bhegade on ajit pawar
bapu bhegade on ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने महामंडळावर काही इच्छुकांच्या नियुक्त्या करून भविष्यातील बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील अशाच प्रकारे काही मतदारसंघातील इच्छुकांना महामंडळ दिली आहेत. हे महामंडळ मला नको मला मावळ मधून विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू साहेब भेगडे यांनी केली आहे.

सध्या मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मावळ मधील भाजपचे नेते मावळ विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) गटात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे आहेत. सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल याची जास्त शक्यता आहे.

bapu bhegade on ajit pawar
Madha News : मोहिते पाटील, स्थानिकांचा विरोध डावलून शरद पवार बबनदादांच्या हाती तुतारी देणार?

त्यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होत काँग्रेस अजित वार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले बापूसाहेब भेगडे यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी म्हणून दादांकडे आग्रह धरला आहे. तुमची समजूत काढण्याच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासन कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे. मी या पदाची मागणी केली नसून मावळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली असून ती मागणी मान्य करून माझी उमेदवारी घोषित करावी अशी भूमिका बापूसाहेब भेगडे यांनी घेतली आहे.

पत्रकार परिषद घेत बापूसाहेब भेगडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ते पंचवीस वर्ष मी तळेगाव नगरीचा नगरसेवक म्हणून कार्यरत आहे ती संधी मला राष्ट्रवादी काँग्रेसने दिली. जिल्हा नियोजन समिती, सहकारी साखर कारखाना पदांवरती काम करताना जनतेची सेवा केली. 2009साली राष्ट्रवादी काँग्रेसने मला या भागातून विधानसभेची उमेदवारी दिली मात्र त्यावेळेस मला अपयश आलं परंतु अपयशयाने खचून न जाता मी सातत्याने काम करत राहिलो आहे. 2014 मध्ये उमेदवार बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आणि तो आम्ही मान्य केला मात्र त्यावेळी देखील पराभवच हाती आला. 2019 ला माझी उमेदवारी जवळपास निश्चित असताना बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तरी देखील आम्ही पक्षासाठी काम केलं.

bapu bhegade on ajit pawar
Ruturaj Patil vs Amal Mahadik : कोल्हापूर दक्षिणमध्ये 'अमल-ऋतूराज' मध्येच बिगफाईट; विकासाचा मुद्दा ठरणार निर्णायक

आता उमेदवार बदलावा अशी मागणी पक्षातून होत असून मी कोणत्याही महामंडळाची मागणी न करता मला विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे. तरी देखील मला त्या महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आला आहे परंतु ते महामंडळ मला नको मला विधानसभेची उमेदवारी द्यावी असा माझा अजित दादांकडे आग्रह असल्याचं बापूसाहेब भेगडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com