Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Hiraman khoskar : काँग्रेसचा आमदार शरद पवारांच्या भेटीला; म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'

Roshan More

Hiraman khoskar News : विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्राॅस वोटिंग केल्याचा संशय आहे. त्या आमदारांना तिकीट देण्यात येणार नाही. या आमदारांमध्ये हिरामण खोसकर यांचे देखील नाव असल्याच्या चर्चा आहेत.

हिरामण खोसकर हे आज (रविवारी) पुण्यात शरद पवार यांच्या भेटी घेतली. मी क्राॅस वोटिंग न करता माझ्यावर अन्याय झाला, असे खोसकर म्हणाले.

मला सुचना केल्या प्रमाणे मी मिलिंद नार्वेकर यांनाच मत दिले होते. मात्र मी क्राॅस वोटिंग केल्याचा माझ्यावर खोटा आरोप करण्यात येते आहे. माझं नाव बदनाम केलं जात असल्याचे खोसकर म्हणाले.

आम्ही तुम्हाला न सांगता मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या. जर माझा विचार आधीच झाला नाही तर मी कुठे उडी मारू शकतो, असे म्हणत पक्षांतर करण्याबाबात निर्णय न झाल्याचे संकेत खोसकर यांनी दिले.

सर्व पर्याय खुले

हिरामण खोसकर यांनी सांगितले की, ते इगपुरीमधील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. मी घरात बसणारान नाही. माझ्यासमोर पर्याय खुले आहेत, असे देखील खोसकर यांनी सांगितले.

तुतारी हाती घेण्यास चढाओढ

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला. लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागा त्यांचे उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी चढाओढ लागली आहे. हर्षवर्धन पाटील सोमवारी पक्षप्रवेश करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT