Gulabrao Patil News: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. काल जळगाव येथे मात्र ते बोलता बोलता हळवे झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मी मंत्रीपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही, असे सांगितले.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांना फैलावर घेतले आहे. ते म्हणाले, राज्याचे सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे. विशेषतः मुख्यमंत्री महिलांची खूप काळजी घेतात. महिलांसाठी त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील लोक त्यांना दुवा देत आहेत.
कुसुंबा (जळगाव) येथे सातबारा उतारा वितरण मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते म्हणाले, विरोधकांना राज्य सरकारचे चांगले काम सहन होत नसावं. विरोधक सत्तेत असताना त्यांनी जनतेसाठी काहीच केले नाही. आता सरकार जे काम करीत आहेत, त्यासाठी ते सरकारवर टीका करतात.
आता निवडणुका आल्या आहेत. अनेक लोक तुम्हाला येड बनवायला येतील. मात्र तुम्ही त्यांच्या फंदात पडू नका. सरकारने लाडकी बहीण योजना आणली. आता दीड हजार रुपये महिन्याला मिळतात. आपले सरकार पुन्हा आल्यावर महिन्याला तीन हजार रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री पाटील भरभरून बोलले. बोलता, बोलता भावनिक देखील झाले. ते म्हणाले, "आज मी तुमच्यासमोर बोलतो आहे. काय सांगावं, उद्या नसेन. मात्र तुमचे काम करून मी जाईन. तुमचे काम केल्यामुळे मी सदैव तुमच्या स्मरणात राहीन"
मी गेली आठ वर्ष राज्याचा मंत्री आहे. पण मंत्रीपदाचा कधी गर्व केला नाही. सामान्य जनतेसाठीच काम करीत आलो. यापुढेही अशीच जनसेवा सुरू राहील, असे मंत्री पाटील म्हणाले.
ज्यावेळेस मी जळगावला निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरायला जाईल, तेव्हा महिलांची संख्या लक्षणीय असली पाहिजे. जर पुरुष १५ हजार असले तर महिला वीस हजार असल्या पाहिजेत. या प्रकारे आपल्याला ताकद दाखवावी लागेल.
मंत्री पाटील यांनी जे लोक गरिबांना हिणवतात, त्यांचा सत्यानाश कर...हेच आमचे देवीकडे साकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. मुख्यमंत्री राज्याच्या जनतेविषयी खूप काळजी करतात. विशेषतः महिलांविषयी त्यांना आस्था आहे लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली. एसटी बस मध्ये महिलांना निम्मी सवलत दिली. त्यामुळे आता बस ताबडतोब भरतात.
एस.टी. महामंडळ नफ्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी आता शपथ घेतली आहे. पुन्हा आपले सरकार आल्यावर महिलांना जे दीड हजार मिळतात, ते तीन हजार रुपये करण्यात येतील. महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळू लागले आहेत. हे केवळ आत्ताच्या सरकारने केले अन्य कुणाला जमले नाही.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.