Varsha Gaikwad  Sarkarnama
महाराष्ट्र

Varsha Gaikwad : 'फडणवीसांकडून खोत यांच्या भाषेचं खंडन नाही'; खासदार गायकवाड म्हणाल्या, 'सत्तेची मस्ती...'

Congress MP Varsha Gaikwad criticizes BJP leader Devendra Fadnavis for not contradicting MLA Sadabhau Khot language criticizing Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी निषेधार्थ विधान करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांच्या भाषेचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी खंडन न केल्यावरून खासदार वर्षा गायकवाड संतापल्या.

Pradeep Pendhare

Mumbai News : शरद पवार यांच्याविषयी निषेधार्थ भाषा करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्या भाषेचे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले नाही. त्यांच्यासमोर खोत बोलत होते. समोर बसून काही जण हसत होते. त्यावर काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

"सत्तेची मस्ती जनता बघत आहे आणि याचे सडेतोड उत्तर जनता 20 नोव्हेंबरला नक्की देईल", असे टोला खासदार गायकवाड यांनी लगावला.

आमदार सदाभाऊ खोत यांची भाषणात जीभ घसरली आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. हा सर्व प्रकार भाजप (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झाला. आमदार खोत यांची या भाषेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले. याशिवाय सर्वच स्तरातून आमदार खोत यांच्या भाषेवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी केलेल्या विधानावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना फोन लावत, हे सर्व झालं नाही पाहिजे. सर्व प्रकार बंद करा. महाराष्ट्रात महापुरूष, महामानव यांच्यासह ज्येष्ठ नेते, महिला-भगिनींचा आदर राखा, अशी एकप्रकारे तंबीच दिली. शरद पवार यांच्यावरील या भाषेचा काँग्रेसकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला.

काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी 'एक्स' खात्यावर पोस्ट लिहित भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील टार्गेट केले. "देशाच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक शरद पवार यांच्याविषयी खालच्या भाषेत टीका केली गेली. आणि हे सर्व भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोललं गेले. तेव्हा एकदाही अशा भाषेचं खंडन करताना ते दिसले नाही.विशेष म्हणजे, या विधानवर खंत व्यक्त करण्याच्या नावाखाली त्यांनी त्यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे", असे खासदार गायकवाड यांनी म्हटले.

"महायुतीला महाराष्ट्रातील महापुरुषांचा थोडाही सन्मान राहिलेला नाही. यांच्या सत्तेची मस्ती जनता बघत आहे. जनता यांना सडेतोड उत्तर येत्या 20 नोव्हेंबरला नक्की देईल", असा इशारा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT