Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : नाना पटोलेंचा पुन्हा 'लेटरबॉम्ब', DGP संजयकुमार यांच्या नियुक्तीवर आयोगाकडे काय केली मागणी

Nana Patole of Congress wrote a letter to the Election Commission drawing attention to the appointment of DGP SanjayKumar Verma : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा नियुक्तीवर पुन्हा पत्र लिहून नेमकी काय मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक (DGP) संजयकुमार वर्मा यांच्या प्रभारी नियुक्तीबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

"राज्यातील निवडणुकीत काळात पोलिस महासंचालक निःपक्षपद्धतीने काम करण्यासाठी वर्मा यांची नियुक्ती प्रभारी नसून, पूर्ण क्षमतेने असावी. वर्मा यांची नियुक्ती प्रभारी करून घटनात्मक तरतुदीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश आणि प्रशासकीय तत्त्वांचे उल्लंघन आहे", असा पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी पोलिस महासंचालकांची प्रभारी नियुक्ती असल्याने निवडणुकीच्या काळात तटस्थपणे आणि निःपक्षपद्धतीने काम करण्यास अडचणी येऊ शकतात, याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. संजयकुमार वर्मा यांच्या प्रभारी नियुक्तीच्या आदेशानर निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर करून त्वरीत हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी पत्रात असे म्हटले आहे की, "निवडणूक (Election) आयोगाने, घटनेच्या कलम 324 अन्वये घटनात्मक अधिकार वापरून, 5 नोव्हेंबर 2024 रोजी तत्कालीन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवले होते. तसा आदेश राज्याचे मुख्य सचिवांना दिला. यानंतर रश्मी शुक्ला यांना हटवून त्यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. परंतु संजयकुमार वर्मा यांची नियुक्ती ही प्रभारी करण्यात आली".

निवडणूक आयोगाच्या सूचनेचे उल्लंघन

'सरकारच्या या डावपेचाकडे लक्ष वेधताना निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभारी नियुक्तीमुळे पोलिस दलाला निष्पक्ष आणि तटस्थ भूमिका बजावाता येणार नाही. त्यामुळे या नियुक्तीत हस्तक्षेप करावा. परंतु निवडणूक आयोगाच्या या सूचनेचे उल्लंघन करून महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांच्या नियुक्तीला आचारसंहितेनुसार मर्यादा घालण्याचा आदेश जारी केला', याकडे देखील नाना पटोले यांनी लक्ष वेधले.

निवडणूक आयोगाला सांगितला धोका

संजयकुमार वर्मा यांच्या प्रभारी नियुक्तीमुळे राज्यातील पोलिस दलाचे नेतृत्व आणि प्रशासकीय सातत्य धोक्यात आले आहे. या निवडणुकीनंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा DGP म्हणून नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा विचार असेल, तर कायदेशीर आणि प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यातून DGP च्या कामगिरीवरही परिणाम होईल, याकडे देखील नाना पटोले यांनी लक्ष वेधले. आता नाना पटोले यांच्या या पत्रावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT