Mumbai News : महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी काय केलं? भाजप नेते अमित शाह यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
"अमित शाह यांना मतदार 20 तारखेला हिशोब देतील. पण हिशोब व्याजासकट असेल", असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
राज्यात विधानसभा निडवणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. भाजप (BJP) नेत्यांची पहिला आणि दुसरी फळी प्रचारात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आदित्यनाथ योगी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, यांच्यासह प्रमुख नेते प्रचारात उतरलेत. महाविकास आघाडीतील राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आदी नेते प्रचारात सक्रिय आहे.
भाजप नेते अमित शाह यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांना प्रत्येक सभेत टार्गेट करत आहे. थेट हल्ला चढवत आहे. राम मंदिर, अयोध्या, जम्मू-काश्मीरमधील 370 कलम, वीर सारवकर, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती विषय काढून घेरत आहेत. यातच शरद पवार यांना टार्गेट करताना महाराष्ट्रासाठी काय केले? असा प्रश्न अमित शाह यांनी केला.
अमित शाह यांची या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत जोरदार प्रत्युत्तर दिले. "अमित शाह यांनी असाच हिशोब लोकसभेला मागितला होता. महाराष्ट्राने मतदानाच्या रूपाने खणखणीत उत्तर दिले. भाजपची महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 23 वरून थेट नऊवर आली. आता अमित शाह यांनी पुन्हा हिशोब मागितला आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र मतदानातू पुन्हा हिशोब देईल. पण हा हिशोब व्याजासकट असेल", असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
"रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये अमित शाह यांच्याकडे देखील हिशोब मागितला आहे. आपण महाराष्ट्रात आला आहात, तर आपण महाराष्ट्रातून गुजरातला काय काय नेले आहे, त्याचा हिशोब द्या. वेदांचा, फॉक्सकॉन गुजरातला नेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध होता की नाही हेही सांगा. आहे का हिंमत भाजप नेत्यांमध्ये?", असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.