Nana Patole 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : 'विशिष्ट' मतदारांची नावं वगळली; पटोलेंनी मंत्री विखेंच्या मतदार संघाला केलं 'टार्गेट'

Shirdi VidhanSabha Constituency targeted by Nana Patole for inclusion of voters from other states in the voter lists : राज्यातील 150 मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू असल्याचे सांगताना नाना पटोलेंनी भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदार संघाला केलं टार्गेट.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्रातील मतदारांची नावे कमी करून त्यात, मतदार याद्यांमध्ये परराज्यातील नावे घुसवली जात आहेत. भाजपच्या या कटकारस्थानात काही अधिकारी सहभागी आहे.

हा गंभीर आरोप महाविकास आघाडीकडून करताना काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचा शिर्डी विधानसभा मतदार संघ टार्गेट केला. शिर्डी मतदार संघात लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त नावं कशी वाढली? असा प्रश्न त्यांनी केला.

महाराष्ट्रातील मतदारांची नावे वगळून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे त्यामध्ये टाकून दहा हजार नावे जोडली जात आहेत, असा आरोप मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

नाना पटोले यांनी आरोप करताना राज्यातील 150 विधानसभा मतदार संघात हा घोळ सुरू आहे. यात शिर्डी (Shirdi), चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिमूर, धामणगा, खामगाव, कणकवली, नागपूर या मतदार संघांतून काही नावे वगळली गेलीा आहेत. ही नावे कोणती आणि का वगळली आहे, याचा शोध मतदारांनी देखील घ्यावा, विशिष्ट मतदारांची नावे वगळून तिथं बाहेरील राज्यातील लोकांची नावे घुसवली जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

मंत्री विखेंचा मतदार संघ टार्गेट

मतदार संघात अचानक नावे कशी वाढतात, याचा आरोप करताना नाना पटोले यांनी भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदार संघाचे उदाहरण दिले. या मतदार संघात लोकसभा निवडणुकीत 2 हजार पेक्षा जास्त मतदार अचानक वाढ झाली आहे. मतदारांची एवढी वाढ कशी झाली? हा घोळ एवढ्या मतदार संघात नसून राज्याती 150 मतदार संघात हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

अमित शाह यांचे कटकारस्थान?

'देशातील निवडणुका निष्पक्ष घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मात्र, त्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे. निवडणुकीत आपण विजयी होऊ शकत नाही. त्यामुळे सत्ता गमवण्याची भीती भाजपला आहे. या भीतीने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे कटकारस्थान लोकशाही विरोधात चालवले आहे. काही मतदार संघ ठरवले आहे. त्यासाठी विशिष्ट अॅपची निर्मिती केली आहे. यातून विशिष्ट मतदार याद्यांमधून वगळायची आणि तिथं बाहेरच्या राज्यातील मतदार घुसवायची, कारस्थान आहे', असा आरोप नाना पटोले यांनी केला.

संजय राऊतांचा इशारा

भाजप महाराष्ट्रातील लोकांचा गळा घोटत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास या प्रकाराविरोधात निवडणूक आयोगावर आम्ही विराट मोर्चा नेणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT