MVA News : शरद पवार गटाचा आकडा ठरला; ठाकरे गटाचे इतके उमेदवार फायनल तर काँग्रेसच काय ?

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास फायनल झाले आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या मीटिंगमध्ये आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते.
 MVA
MVASarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दोन दिवसांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लवकरच उमेदवाराची घोषणा होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास फायनल झाले आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या मीटिंगमध्ये आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते. त्यानुसार शनिवारी शरद पवार (Sharad pawar) गटाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. (MVA News)

त्यामध्ये किती जागा लढणार याचा आकडा ठरला आहे. त्यानुसार पवार गट 85 जागा लढणार आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने जवळपास 43 जागांवरील उमेदवारांची यादी फायनल केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव ठरविण्यासाठी रविवारी मुंबईत काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होत आहे. त्यामध्ये प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीने पाठवलेल्या यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.

दरम्यान, आघाडीच्या जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवर भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 MVA
MVA News : मुंबईमध्ये मविआत ठाकरे गटच मोठा भाऊ; कोणाच्या वाट्याला किती जागा ?

शरदचंद्र पवार पक्षाने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने जागा घेतल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती देखील मिळाली. पार्लमेंट्री बोर्डाच्या मीटिंगनंतर पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जबादाऱ्यांचे वाटप करण्यात आले.

शरद पवार गटाचे 58 उमेदवार फायनल

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित झाले आहेत. सध्या उमेदवार निश्चित झालेल्या 58 विधानसभा मतदारसंघात अणुशक्ती नगर विधानसभेचा समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही पक्षांतर्गत 27 उमेदवार निश्चित होणे बाकी असल्याचे समजते.

ठाकरे गटाचे 43 उमेदवार ठरले

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीचे सत्र मातोश्रीवर सुरु आहे. नेतेमंडळी उमेदवारांची यादी फायनल करीत असून जवळपास 43 जागांवरील उमेदवारांची यादी फायनल करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. उर्वरित नावावर येत्या एक ते दोन दिवसात एकमत होणार आहे. त्यांनतर उमेदवारांच्या नावाची घोषणा हॊणार आहे. त्यामुळे सर्वांचे या यादीकडे लक्ष लागले आहे.

 MVA
Ramdas Kadam News : निवडणुकीपूर्वी रामदास कदमांचं मोठं भाकीत; म्हणाले,'ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही पराभव...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com