Sharad Pawar- Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Video Sharad Pawar : 'स्थिर सरकारसाठी जास्तीत जास्त सभा घ्या', शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

Sharad Pawar Narendra Modi Assembly Election: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्याला सर्व नेते, मराठा, ओबीसी नेत्यांना बोलवावे. आणि त्यातून आरक्षणावर मार्ग काढावा, असे शरद पवार म्हणाले.

Roshan More

Sharad Pawar News: विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधीत शिल्लक राहिला आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा काॅन्फिडन्स वाढला आहे. मुख्यमंत्रि‍पदावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र,यामध्ये तथ्य नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावात, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

शरद पवार म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 सभा घेतल्या. त्यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी आमचे 14 उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला स्थिर सरकार देता येईल.'

मुख्यमंत्रि‍पदावरून मतभेद नाहीत

मुख्यंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर करावे, असे संजय राऊत म्हणाले होते. तर, ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदावरून मतभेद असल्याच्या चर्चा होत्या.

मात्र, महाविकास आघाडीमध्ये अजिबात मतभेद नाहीत. आम्हाला कशाच्या अपेक्षा नाही. माझे नाव त्यात (मुख्यमंत्री पदासाठी) असेल तर मी त्यात नाही. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाबाबत जे मत मांडले ते दुर्लक्षित करण्यासारखे नाही, असे शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाप्रश्नी संयुक्त बैठक...

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्याला सर्व नेते, मराठा, ओबीसी नेत्यांना बोलवावे. आणि त्यातून आरक्षणावर मार्ग काढावा. माझे वैयक्तिक मत आहे की 50 टक्यांच्यावर आरक्षण देण्यासाठी धोरणात बदल करावा लागेल. त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT