Sharad Pawar News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवार जातीपातीचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्रात मणिपूर सारख्या दंगली घडवण्याचा आरोप राज ठाकरेंनी शरद पवार यांचे नवा घेत केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपांना शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे
'राज ठाकरेंनी दोन तीनदा माझं नाव का घेतलं हे मला कळलेलं नाही. मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो. माझी पार्श्वभूमी तशी नाहीये.', असे म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
'त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं. मी देखील मराठवाड्यात फिरतोय. लोकांना मला देखील अडवलं. निवेदन दिलं. हे पण पवारच करतात का?', असे म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे. त्यावेळी यावर निर्णय घेता येईल. माझे वैयक्तीक मतं हे आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्कापेक्षा जास्त असावी, असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद असल्याचे बोलले जात आहे. या विषयी पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये अजिबात मतभेद नाहीत. आम्हाला कशाच्या अपेक्षा नाही. माझे नाव त्यात (मुख्यमंत्री पदासाठी) असेल तर मी त्यात नाही. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाबाबत जे मत मांडले ते दुर्लक्षित करण्या सारखे नाही, असे शरद पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.