Balasaheb Thorat  Sarkarnama
महाराष्ट्र

Balasaheb Thorat : कांदा उत्पादकांनी मतदान केलंय, त्यांना 'प्याज जिहाद' म्हणायचे? बाळासाहेब थोरात, असे का म्हणाले

Senior leader Balasaheb Thorat response to Prime Minister Narendra Modi allegations against Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या पहिल्या सभेत काँग्रेसच्या जातीभेदाच्या राजकारणावर टीका करताच, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे जोरदार प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने धुळे आणि नाशिकमध्ये पहिल्या सभा घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधी, एकंदर गांधी परिवाराच्या जातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली.

पंतप्रधान मोदींच्या या टिकेला काँग्रेसने देखील आक्रमक पद्धतीने उत्तर देण्यासाठी पुढे आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या जातीपातीच्या आणि धार्मिक राजकारणावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप ओरडत असलेल्या व्होट जिहादला देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, "काँग्रेसने (Congress) कधीत जाती-पातीमध्ये भांडण लावली नाही. धार्मिक भेद केला नाही. एक विचाराने सर्वांना बरोबर घेऊन काम केले. परंतु अलीकडच्या काळात भाजपने सत्तेसाठी जाती-पातीत भांडण लावलं सुरू केली आहे. धार्मिक गोष्टींवर समाजामध्ये वाद निर्माण केलेत". हे काम करण्यात भाजप पारंगत आहे, असा टोला देखील थोरात यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (BJP) यांनी नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना काँग्रेसवर नाशिणा साधून वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करत नसल्याचा टोला लगावला होता. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, "'मविआ' सरकारमध्ये आम्ही एकत्र आलो. चांगले काम केले. सर्वसमावेश कार्यक्रम घेऊन 'मविआ' सरकार चालवले. ठाकरे घरण्याचे विचार पुरोगामी आहेत. त्यांच्या रक्तातच पुरोगामी विचार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आम्ही ठरलेल्या कॉमन मिनिमम कार्यक्रमनुसार काम केले".

बटेंगे तो कटेंगे, व्होट जिहाद महाराष्ट्राच्या राजकारण वाढला आहे. तसे आरोप होत आहेत. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, "व्होट जिहाद हे दरवेळी ओरडत असतात, तर आम्हाला कांदा उत्पादकांनी मतदान केले, त्यांना प्यास जिहाद कहेंगे". शेतकऱ्यांनी मतदान केले त्यांना शेतकरी जिहाद कहेंगे, माता-भगिनींनी मतदान केले आहे. त्यांना देखील माता-भगिनी जिहाद कहेंगे, भाजप खूप चुकीचे राजकारण पेरत आहे, असा टोला देखील थोरात यांनी लगावला.

नरेंद्र मोदी काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना डिवचलं. ते म्हणाले, "वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत मोठे योगदान आहे. या दोघांच्या प्रशंसा कधी काँग्रेसने केलेली नाही. काँग्रेस कितीवेळा बाळासाहेब ठाकरेंची, त्यांच्या विचारधारेची सार्वजनिकपणे प्रशंसा करते, हे पाहू, असे चॅलेंज देत आज आठ नोव्हेंबर आहे. मी दिवस मोजत आहे. मी महाविकास आघाडीकडून उत्तराची वाट पाहीन".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT