Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ठाकरेंची तोफ धडाडणार; 36 सभांमधून विरोधकांवर बरसणार

ShivSena party chief Uddhav Thackeray will hold 36 meetings in Maharashtra state to campaign for MVA candidates : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ केला असून, राज्यात त्यांच्या सभांचे 18 नोव्हेंबरपर्यंत नियोजन ठरले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : दिवाळीतील फटाक्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडू लागलाय. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा निश्चित झाल्या आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ आजपासून धडाडणार आहे. राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तब्बल 36 सभांचे नियोजन आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराला कोकणातील रत्नागिरी इथं आज प्रचार सभा घेऊन करतील. उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग या सभेतून फुंकणार आहेत. उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांसाठी पहिलीच प्रचार सभा असल्याने ते नेमकं काय बोलतात, याकडे लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या 18 तारखेपर्यंत प्रचारसभांचे नियोजन आहे. एकूण 36 सभा ते घेणार आहेत. शेवटची प्रचार सभा पुण्यातील खेड आळंदी आणि मुंबईतील वांद्रे पूर्व इथं होईल. परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे प्रचाराचे प्रमुख केंद्र हे मुंबई असणार आहे. मुंबईत शिवसेनेची (Shivsena) ठाकरे पक्षाची ताकद कायम राहावी, यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते, उपनेते प्रचंड अॅटिव्ह झालेत. या विधानसभान निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती मुंबईतील ताकद कमी होऊ द्यायची, असा चंग शिवसेना ठाकरे पक्षाने बांधला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांमध्ये प्रमुख लक्ष असणार आहे, भाजप आणि एकनाथ शिंदे. विरोधकांवर टीका करताना उद्धव ठाकरे ठाकरी शैलीत कोणता शब्दप्रयोग करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'फडतूस' हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. त्यावरून बरच राजकारण तापलं होते. फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर देताना ''फडतूस' नहीं, 'काडतूस' हूं', असा टोला लगावला होता.

महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांनी देखील प्रचार सभांचे नियोजन ठरवले असून, त्यांच्या राज्यात जवळपास 56 सभांचे नियोजन केले आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह राज्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या प्रचाराचे नियोजन तयार करण्यात असून, विभागनिहाय प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीकडून देखील प्रचारसभांचे नियोजन आखले गेले आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT