Deepak kesarkar Raj Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Deepak kesarkar : राज ठाकरे महायुतीत येणार? मंत्र्याने केलं मोठं वक्तव्य, 'शिंदे-फडणवीसांसोबत त्यांचे चांगले संबंध'

Roshan More

सागर आव्हाड

Deepak kesarkar News : राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणे केली. 225 ते 250 जागांवर मनसे निवडणूक लढवणार असून काही करून मनसेच्या कार्यकर्त्यांना सत्तेत आणणार, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र, राज ठाकरेंच्या स्बळाच्या घोषणेनंतर अवघ्या 24 तासांत महायुतीचे मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

'राज ठाकरे यांचे शिंदे साहेब तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहे. राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहे. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हा नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल. त्यांना महायुतीत आणू.' असा ठाम विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

दिपक केसरकर म्हणाले, अजून निवडणुकीला उशीर आहे.प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो. आमची महायुती असून मागच्या वेळी राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हा नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल.

फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र

फार मोठे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केले जात आहे. खरं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेला आहे ते फडणवीस साहेब यांनी स्वतः लक्ष घालून दिले. महाविकास आघाडीने ते आरक्षण टिकवलं नाही. आता आम्ही दिलेला आरक्षण हे देखील टिकणारे आरक्षण आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची असल्याचे देखील केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT