Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : रडताय काय,मर्दा सारखे लढा; मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना ललकारले

Eknath Shinde Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मात्र, विरोधक पेढे वाढतायते. अरे तुम्ही पेढे कसले वाटताय हरल्याचे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Roshan More

Eknath Shinde News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरी आपला स्ट्राईक रेट चांगला आहे. आम्ही उबाठा विरोधात 13 जागांवर लढलो आणि सात जागांवर विजय मिळवला. खोट्या प्रचारामुळे त्यांना थोडे बहुत यश मिळाले. पण ते रडतयाते चिन्ह चोरलं म्हणून. रडताय काय मर्दा सारखे लढा, असे शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ललकारले.

उद्धव ठाकरेंना जे थोडे बहुत यश लोकसभेत मिळाले ते विधानसभेत मिळणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मात्र, विरोधक पेढे वाढतायते. अरे तुम्ही पेढे कसले वाटताय हरल्याचे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरला म्हणून ते रडतायेत. 55 पैकी 40 आमदार आमच्या सोबत होते. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजुने आहेत. बहुमत कोणाकडे आहे त्यावर निर्णय होत असतो. निवडणूक आयोगाने माझ्या बाजुने निर्णय दिला. तरी ते चिन्ह चोरलं म्हणून रडतं आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

सूज उतरेल

लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. त्यांना जे यश मिळाले ती सूज आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत ती सूज उतरेल. ते म्हणत होते घटनाबाह्य सरकार आहे. आज पडेल, उद्या पडेल. पण आम्ही दोन वर्ष खूप काम केलं आहे. जे काम ते अडीज वर्ष घरी बसून करू शकले नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT