Vinod Tawde On Sharad Pawar : 'कारण, बऱ्याच गोष्टी शरद पवार मोदींकडून करून घेऊ शकतात' ; विनोद तावडेंचं विधान!

Vinod Tawde and Sharad Pawar News '...त्यासाठी शरद पवारांच्या मदतीला मी नक्की असेन' असंही विनोद तावडे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.
Vinod Tawde On Sharad Pawar
Vinod Tawde On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Vinod Tawde Pune News : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे या कार्यक्रमात हे दोघेही नेते नेमकं काय बोलतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती.

दरम्यान, विनोद तावडे(Vinod Tawde) यांनी भाषणात शरद पवारांबाबत केलेलं विधान सध्या चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनेक कामं करून घेऊ शकतात. असं तावडे म्हणाले. शिवाय, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी मी शरद पवारांसोबत नक्कीच असेन, असंही सांगितलं. याप्रसंगी भाषणात बोलातना शरद पवारांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, असं बोलून दाखवलं.

Vinod Tawde On Sharad Pawar
Sharad Pawar: VIDEO मविआ CM पदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी थेटच सांगितलं, म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण...

भाषणात विनोद तावडे म्हणाले, 'अण्णाभाऊंचं फारसं प्रकाशित न झालेलं व्यक्तिमत्व किंवा दुर्लक्षित झालेलं त्यांचं साहित्य. या दोन्हींची दखल केवळ महाराष्ट्रानेच नाही, तर संपूर्ण देशाने घेतली पाहीजे आणि पुढची भारतरत्नची जी जबाबदारी आहे, त्यासाठी शरद पवारांच्या(Sharad Pawar) मदतीला मी नक्की असेन. कारण, बऱ्याच गोष्टी ते पंतप्रधान मोदींकडून करून घेऊ शकतात, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.'

Vinod Tawde On Sharad Pawar
Sharad Pawar : मराठा आरक्षणाचा तिढा कसा सुटणार? शरद पवारांनी सुचवला मार्ग

तर 'अण्णाभाऊंना भारतरत्न देणं, याचा अर्थ अण्णाभाऊंची प्रतिष्ठा नव्हे भारतरत्न पुरस्काराची प्रतिष्ठा वाढती राहील. यासाठी याची गरज आहे.' असं शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com