ShivSenaUBT Meeting Sarkarnama
महाराष्ट्र

ShivSenaUBT Meeting : 'मातोश्री'वर बैठक, 'महायुती'पेक्षा 'मविआ'त टेन्शन वाढलं

Urgent meeting of ShivSena Uddhav Balasaheb Thackeray party leaders in Mumbai : विधानसभान निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्याची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांमध्ये बैठकांचा धमाका सुरू आहे. परंतु सर्वाधिक लक्ष लागलं आहे, ते म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या बैठकांकडे! जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात धुसफूस रंगली होती.

या वादावर तोडगा निघून काही तास होत असताना, आज 'मातोश्री'वर नेत्यांची तातडीची बैठक होत असल्याची माहिती नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. या बैठकीचे कारण गुलदस्त्यात ठेवत, काही महत्त्वाच्या निर्णयांसाठी ही बैठक होत असल्याचे संजय राऊत यांनी सांगून महायुतीपेक्षा 'मविआ'त या बैठकीची चर्चा रंगली आहे.

संजय राऊत म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी आज सकाळी चर्चा झाली. त्यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना नेत्यांची दुपारी साडेबारा वाजता तातडीची बैठक होत आहे. महाविकास आघाडीची काल बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे नेत्यांशी चर्चा करावीच लागेल. आम्ही सगळे 'मातोश्री'वर जाऊ, चर्चा करू आणि पुढल्या वाटचालीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते ठरवू".

चेन्निथला यांच्या शिष्टाईचं काय झालं?

या शिवसेनेच्या तातडीची बैठकीची माहिती देताना, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा पाया टिकाला पाहिजे, आणि तो टिकावा यासाठी आम्ही कसोशी प्रयत्न करत आहोत, असे विधान केले आहे. यातच जागा वाटपावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालमेळ अजूनही बसला, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिष्टाई झाल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु ही शिष्टाई खरच यशस्वी ठरली का? हा प्रश्न आजच्या मातोश्रीवरील तातडीच्या बैठकीमुळे समोर आला आहे.

सत्ता परिवर्तन नक्की

विधानसभा निवडणुकीत जागावाटपावर महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये 10 तास बैठक झाली. या बैठकीनंतर आज रविवारी दुपारी साडे बारा वाजता शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतोय, याकडे आता लक्ष लागलं आहे. म

हाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत.महाराष्ट्रामुळे संविधान बजावची मोहीम यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकडीचा पराभव सहज करू शकतो. त्या दृष्टीने आमची पावले पडताहेत. कुणी काही म्हणू द्या, या राज्यात सत्ता परिवर्तन होणार हे नक्की’, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT