Shivsena UBT Politics: धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण? आज निर्णय!

Shiv Sena Thackeray Candidate Dhule: माजी आमदार अनिल गोटे यांचा महाविकास आघाडीतील प्रवेश शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी रोखला.
Sanjay Raut & Anil Gote
Sanjay Raut & Anil GoteSarkarnama
Published on
Updated on

Dhule City Elections 2024: धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण? यावर आज काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे. हा मतदारसंघ शिवसेना गटाकडेच असावा, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत मोर्चे बांधणी केली होती.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दोन आठवड्यांपूर्वी धुळे शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी लोकसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. जवळपास अर्धा तास झालेल्या या चर्चेत अनिल गोटे यांनी महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी करावी यावर चर्चा झाली होती.

खासदार राऊत यांचे त्याबाबत सकारात्मक मत होते. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध होता. शनिवारी यासंदर्भात मुंबईत बैठक झाली. यामध्ये धुळे जिल्ह्यातील जागावाटप पूर्ण झाले.

धुळे शहर हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनिल गोटे यांना पुरस्कृत करण्यास प्रचंड विरोध केला. त्यामुळे शेवटी शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार धुळे शहरातून निवडणूक लढवेल असे ठरले.

Sanjay Raut & Anil Gote
Nandgaon Politics: आमदार कांदे, भुजबळ यांच्या विरोधात आता नांदगावकरांचा 'देवदूत' मैदानात!

सध्या जिल्हाप्रमुख माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि डॉ सुशील महाजन हे दोघे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक आहेत. यातील एका नावावर आज दुपारी शिक्कामोर्तब होईल. यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही उमेदवारांना शहरात जाऊन निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या निर्णयानंतर धुळे शहरात 2019 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार, हे स्पष्ट झाले आहे. आमदार फारुक शहा हे एमआयएमचे उमेदवार असतील. याशिवाय महायुतीतर्फे भाजपचे अनुप अग्रवाल संभाव्य उमेदवार आहेत. वंचित आघाडीने देखील जितेंद्र शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

धुळे शहर मतदार संघात यंदा पंचरंगी लढत असेल. त्यात मत विभागणी आणि नेत्यांची जमवाजमव महत्त्वाची असेल. त्याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, याची उत्सुकता आहे.

Sanjay Raut & Anil Gote
Nashik Central Constituency: 'नाशिक मध्य'चे संकट; काँग्रेस- शिवसेना आणि भाजप तिन्ही पक्ष प्रचंड चिंतेत?

या मतदारसंघात आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक पाटील यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे. `एमआयएम`चे आमदार शहा यांना गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नको म्हणून एका मोठ्या गटाने मदत केली होती. माजी आमदार गोटे यांनीही मत विभागणी करण्यात मोठे यश मिळवले होते.

त्यामुळे निसटत्या मताधिक्क्याने `एमआयएम` ला धुळे शहर जिंकता आले. यंदा शिवसेना आणि भाजप दोघेही परस्परांच्या विरोधात आहेत. शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसची ही मदत होणार आहे. त्यामुळे एक प्रमुख उमेदवार म्हणून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com