Eknath Shinde News: लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठींबा देणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत महायुतीने पाठींबा दिलेला नाही. माहीम मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे उमेदवार आहेत.
अमित ठाकरें यांना पाठींबा देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमित ठाकरेंसाठी भांडूपमध्ये आपण पाठींबा देण्यास तयार होतो पण परस्पर अमित यांची उमेदवारी माहीमधून जाहीर करण्यात आली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. 'साम टीव्ही'ने याविषयी वृत्त दिले आहे.
आम्ही भांडूपमधून अमित ठाकरेंना पाठींबा देण्यास तयार होतो. मात्र, राज ठाकरे यांनी माहीममधून उमेदवारी जाहीर केली. तसेच सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र राज यांनी भेट देखील नाकारली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सदा सरवणकर यांनी माहीम मतदारसंघात तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा अमित ठाकरेंना होईल, असे सांगत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता.
माहीम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत हे माहीम मतदारसंघात उमेदवार आहेत. मात्र, माहीममध्ये आपण एकही प्रचार सभा घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. माहीम हा आपला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे प्रचारसभा घेणार नसल्याचे देखील स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.