Mahayuti VS Mahavikas Aghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election : मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत, प्रचाराला मिळणार अवघे 14 दिवस

Assembly Election bjp Congress Shivsena ncp : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. तर, अमित शाह हे 40 सभा महाराष्ट्रात घेणार आहेत. योगी आदित्यनाथ हे देखील भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.

Roshan More

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख चार नोव्हेंबर आहे. त्यामुळे सोमवारी (ता.4) निवडणुकीच्या मैदानात कोण असणार आणि बाहेर कोण पडणार याचे चित्र स्पष्ट होईल.मंगळवार पासून राजकीय पक्षांच्या प्रचाराचा धडका सुरू होईल. मात्र, उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

मंगळवारपासून उमेदवारांना प्रचारासाठी अवघे 14 दिवस मिळणार आहेत. मतदान 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तर प्रचाराच्या तोफा 18 नोव्हेंबरला थंडावणार आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. बंडखोरांची समजूत घालण्यासाठी फक्त आजचा (रविवार) एकच दिवस नेत्यांच्या हातामध्ये आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येईल बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नेत्यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देखील बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

सभांचा धडाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. तर, अमित शाह हे 40 सभा महाराष्ट्रात घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रचाराला सुरुवात सोमवारपासून ठाण्यात करण्यात येणार आहे.

मनोज जरांगेंच्या भूमिकडे लक्ष

मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितलेल्या उमेदवारांना आज (रविवारी) अंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास जरांगे सांगणार की निवडणूक लढण्यावर ते ठाम राहणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT