Sanjay Shirsat News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेची सांगत बुधवारी इस्लामपूरमध्ये झाली. या यात्रेच्या सांगता समारंभात बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत दिले.
महाविकास आघाडीच्या सरकार आल्यास जयंत पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी असेल, असे शरद पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांच्या या विधानावरून जयंत पाटील हे दुसऱ्या कुठल्या पक्षात जाऊ नयेत म्हणून पवार असे बोलत असल्याची टीका शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली आहे.
शिरसाट म्हणाले, जयंत पाटील आहेत तेथे चांगले राहावेत. जयंत पाटलांचा इतिहास शरद पवारसाहेबांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका माहिती आहे. मला तरी वाटतं जयंत पाटील हलू नयेत ते गोड बोलून काय करतील याचा नेम नसल्याने त्यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली असावी.
जयंत पाटील यांनी आहे त्या ठिकाणी राहावेत. त्यांनी पक्षाचा प्रचार करावा अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला देखील शिरसाट यांनी जयंत पाटलांना लगावला.
विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटपाबाबत बैठक होत आहेत. पुढील आठवड्यात जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारी ठरवण्याबाबतचा अंतिम निर्णय असेल असे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.