MLA Rahul Aher : आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार, केदा आहेर यांची केली शिफारस

MLA Rahul Aher Withdrawal Assembly Election: कौटुंबिक, राजकीय वाद टाळण्यासाठी आमदार डॉ राहुल आहेर यांनी दिली केदा आहेर यांना विधानसभेसाठी चाल.
Keda Aher & MLA Dr Rahul Aher
Keda Aher & MLA Dr Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

Chandwad Constituency: चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघात आज धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर. यांनी अनपेक्षीत घोषणा केली. त्यांच्या घोषणेने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

भाजपचे दोन टर्म आमदार असलेले डॉ आहेर यांना त्यांच्या कुटुंबातूनच राजकीय विरोध सुरू झाला होता. त्यांचे बंधू आणि भाजपचे माजी जिल्हाप्रमुख केदा आहेर यांनी उमेदवारी करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची मोठी उत्सुकता होती.

आज याबाबत आमदार डॉ आहेर यांनी पुढाकार घेत त्यावर पडदा टाकला. गेले दहा वर्षे मतदारसंघाच्या विकासासाठी आपण काम केले. यापुढे आपण विधानसभेची उमेदवारी करणार नाही, असे त्यांनी केदा आहेर यांच्या उपस्थितीतच पत्रकार परिषदेत जाहीर केले.

दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून याविषयीचा निर्णय कळविला होता. त्यांच्याकडे परवानगी मागितली होती. काल सायंकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला संमती दिली.

Keda Aher & MLA Dr Rahul Aher
Heena Gavit: आमदार-खासदार पिता-पुत्राचा 'गेम' करण्यासाठी माजी खासदार विधानसभेच्या मैदानात

त्यामुळे आता आगामी निवडणुकीत केदा आहेर हे पक्षाचे उमेदवार असतील, असे त्यांनी जाहीर केले. आमदार डॉ राहुल आहेर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्य मंत्री डॉ डी. एस. आहेर यांचे पुत्र आहेत. ते दोन टर्म या मतदारसंघातून निवडून गेले होते.

चांदवड- देवळा मतदारसंघात भाजपच्या विचारधारेला मांनणारा मोठा वर्ग आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सध्या नाफेडचे संचालक असलेले केदा आहेर यांनी आपण उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात दौरे देखील सुरू केले होते.

भाजप कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये यंदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण? याची उत्सुकता होती. त्यावर आज डॉ आहेर यांनी केलेल्या घोषणेने उत्तर मिळाले आहे.

Keda Aher & MLA Dr Rahul Aher
Mahayuti Politics: मुक्ताईनगर मतदारसंघाचा वाद; भाजपकडून खडसेंना सेफ पॅसेज मिळेल?

हा मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिक विभागणी असलेला मतदारसंघ आहे. यामध्ये देवळा तालुक्यात सुमारे एक लाख आणि चांदवड तालुक्यात सुमारे दोन लाख मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही तालुक्यांमध्ये पाठिंबा मिळणाऱ्या उमेदवाराला संधी मिळत असते.

या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत काय होते याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कोतवाल, चांदवड बाजार समितीचे अध्यक्ष संजय जाधव आदी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी भाजपचे डॉ आहेर हेच उमेदवार असतील, असे गृहीत धरून निवडणुकीची तयारी केली होती.

आता या निवडणुकीला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. आमदार डॉ आहेर यांच्या घोषणेने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः चांदवड तालुक्यातील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. एकंदरच विद्यमान आमदार डॉ आहेर यांनी केलेल्या घोषणेने अनेकांना तो अनपेक्षित निर्णय वाटतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com