Praful Patel, Ajit Pawar, Nawab Malik  Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Winter Session : सत्ताधारी अजित पवार गटाच्या नेतेमंडळीना केले जातेय लक्ष्य; विरोधकांकडून हल्लाबोल

Political News : पहिल्या आठवडयात विरोधकांना अधिकच बळ मिळाले आहे.

Sachin Waghmare

Winter Session : विधिमंडळांचे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकाला घेरण्याची एकही संधी सॊडली जात नाही. माजी मंत्री नवाब मालिक यांच्यामुळे सत्ताधारी अजित पवार गटाच्या अडचणीत भर पडली असतानाच त्यामुळेच पहिल्याच आठवडयात विरोधकांना अधिकच बळ मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधकांनी रणनीती आखली असून अजित पवार गटाला टार्गेट केले जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल व इक्बाल मिर्ची यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांचा असणार आहे.

विरोधकांनी राजकीय हल्लाबोल करण्यासाठी आता केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल (Praful patel ) व इक्बाल मिर्ची, मंत्री हसन मुश्रीफ या सह अन्य काही नेत्यांची यादी विरोधकाने तयार करून ठेवली असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात विविध मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

नवाब मलिक (nawab malik) यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र देऊन त्यांच्यावर असलेल्या अनेक आरोपांची आठवण करून दिली होती. मात्र, त्यामुळेच विरोधकांना बळ मिळाले आहे. यामुळे अधिवेशन काळात राष्ट्रवादीचा अजित पवार गट बॅक फुटवर गेला आहे. नवाब मलिक येत्या काळात आता अधिवेशनाला हजर राहण्याची शक्यता कमी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशनाचे अद्याप सात दिवसाचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनाच्या काळात अवकाळी, गारपिटीमुळे झालेले पिकाचे नुकसान व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काळात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हिवाळी अधिवेशनात उर्वरित काळात कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून फ्लोअर मॅनेजमेंट केली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यावरच या अधिवेशनाचे यश व अपयश अवलंबून असणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT