Rajesh Kshirsagar News : वडिलांना मारहाण होताना पाहून माजी आमदाराशी भिडणाऱ्या शौर्यचा सत्कार!

Shaurya Varpe : शिवसेनेने(ठाकरे गट) घेतली प्रकरणात उडी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
Shaurya Varpe
Shaurya VarpeSarkarnama
Published on
Updated on

Kalhapur News : दोन दिवसांपूर्वी शनिवार पेठ कोल्हापूर येथे माजी आमदार राजेश क्षीरसागर व त्यांचा मुलगा ऋतुराजसह कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची तक्रार राजेंद्र वरपे यांच्याकडून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. परंतु याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसून, पोलिसांकडून चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे.

तर गुन्हा नोंद होत नसल्याने संबंधित कुटुंबातील तरुणीने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शनिवारपेठ परिसरात क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाकडून राजेंद्र वरपे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

विशेष म्हणजे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणी शिवसेना(ठाकरे गट) आक्रमक झाला असून, पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली असून, संबंधित पोलीस निरीक्षकावर कारवाई करावीची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन ठाकरे गटाने निवेदन दिले आहे. ''राजकीय दबावाखाली जर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काम करणार असतील आणि सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यास असमर्थ असतील, तर त्यांना ताबडतोब निलंबीत करावे.'' असे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shaurya Varpe
Rajesh Kshirsagar : माजी आमदाराचं शेजाऱ्यांशी भांडण; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल..

कोणी दहशत माजवली, कशासाठी मारहाण केली? हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे, तरी पण कसली चौकशी करताय? त्या कुटुंबातील लोकांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना न्याय मिळणार काय? हे पोलीस अधीक्षक स्पष्ट करावे, असे प्रश्न ठाकरे गटाने विचारले आहे.

याशिवाय ''कायद्याचे राज्य आहे हे म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीस(Devendra Fadanvis) व मुख्यमंत्र्यानी या गंभीर प्रकारामध्ये लक्ष घालावे. कायमच दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तीच्या माजी लोकप्रतिनीधीला दिलेले पद ताबडतोब काढून घ्यावे. गंभीर प्रकारामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल.'' असं म्हटलं आहे.

Shaurya Varpe
Kolhapur Political News : कोल्हापुरात भाजपच्या महिलांचे काँग्रेसच्या 'साहू'ना 'जोडे'

याचबरोबर '' या अगोदर सुध्दा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याबाबत काय घडले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. एका मागासवर्गीय बांधवाला याच माजी लोकप्रतिनीधीने मारहाण करताना सर्वांनी पाहिले आहे, अशा अनेक घटना घडून सुध्दा ही व्यक्ती जर मोकाट सुटणार असेल तर भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.'' असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

धाडसी 'शौर्य'चा सत्कार

माजी आमदार राजेश क्षीरसागर व त्यांचा मुलगा ऋतुराज यांनी राजेंद्र वरपे यांना मारहाण केली. तर स्वतःच्या वडिलांना झालेली मारहाण सहन न झाल्याने शौर्य वरपे याने क्षीरसागर पिता पुत्रांना प्रतिकार करत आव्हान दिले. त्याबद्दल ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी शौर्य वरपे यांचा सत्कार केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com