Sanjay Shirsat News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील बंगल्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. शिरसाट यांच्या बंगाल्याच्या मागे काही तरुण मद्यपान करत होते. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी धमकी देत शिरसाट यांच्या बंगल्याच्या दिशेने बाटल्या भिरकावल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मंत्री शिरसाट यांच्या बंगल्याच्या मागील बाजुस मद्यपान करणाऱ्या तरुणांना हटकले. त्यानंतर त्या मद्यपींनी थेट पोलिसांशी हुज्जत घातल त्यांना दिली.
अनेक ओएसडी माझ्या खिशात आहेत अशी धमकी देत थेट बंगल्याच्या दिशेने रिकाम्या बाटल्या भिरकावल्या. पोलिस आणि मद्यपी तरुणांमध्ये झटापट झाली. यामध्ये एक पोलिस किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन मद्यपी तरुणांनी गोंधळ घातला. दरम्यान, पोलिस ठाण्यातून तात्कळ येथे काही पोलिस आले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, तीन युवक माझ्या बंगल्यासमोर आले. दारु पिल्याचे आवस्थेत ते होते असं दिसतय. बाटल्या फोडल्या, सुरक्षारक्षक होते त्यांना अनेक ओएसडी माझ्या खिशात आहे, असे म्हटले. त्यानंतर घराकडे येत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल माझा अपेक्ष नाही. एकाद्या वेळेला ते प्यायलेले असतील. त्यांना कोणी सांगितले असेल तो भाग वेगळा. पण मुळ मुद्दा आहे की पोलिस नेमकं काय करतात?
पुढे बोलताना ते म्हणाले, पोलिस कमिशनरचा फोन बंद आहे. एकही डीसीपी नाहीये, एकही एसीपी नाहीये. एका पालकमंत्र्याच्या घरावर हल्ला होतोय, त्याची दखल तर घ्या. मी एका गोष्टीला मानेल की महाराष्ट्राचे डीजी यांना मी रात्री बारा वाजता फोन केला. त्यांनी फोन उचलला. त्यांनी सांगितले की शिरसाटसाहेब मी योग्य ती कारवाई करतो. मी सगळी माहिती घेतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.