Sanjay Shirsat : सरकारी मदतीला विरोध करणाऱ्या विरोधकांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती म्हणून फराळ तरी वाटलायं का? संजय शिरसाट संतापले?

Diwali relief package: शेतकऱ्यांना दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या विरोधकांनी फराळ तरी वाटला का, असा सवाल त्यांनी केला.
Diwali relief package
Diwali relief packageSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics news : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना पाच हजाराची तातडीची मदत देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी या मदतीवरून टीका सुरू केली आहे. पाच हजारात दिवाळी साजरी होते का? सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, अशा भाषेत विरोधक तोंडसुख घेताना दिसत आहेत. यावर संतप्त झालेल्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

"राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, त्यांना दुष्काळात दिलासा मिळावा, त्यांच्या घरातही दिवाळीचा प्रकाश व्हावा, या उद्देशाने पाच हजारांची तातडीची मदत जाहीर केली आणि ती थेट खात्यात दिली. विरोधकांना ही मदत कमी वाटत असेल, परंतु गावात, खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्यांच्या कुटुंबाला यातून निश्चितच काही ना काही आधार मिळाला आहे. टीका करणाऱ्या विरोधकांना जर ही मदत कमी वाटत असेल तर त्यांनी आपल्याकडून आणखी पाच हजारांची मदत करावी". असा सणसणीत टोला विरोधकांना लगावला.

"सरकारने केलेल्या मदतीला नाव ठेवायचे, स्वतः मात्र शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती म्हणून साधा फराळ तरी वाटलायं का? असा सवाल करत टीका करणे एवढेच विरोधकांना काम आहे, अशी टीका त्यांनी केली. "लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्या माध्यमातून दीड हजारांची मदत दिली तेव्हाही हे विरोधक टीकाच करत होते. त्यामुळे त्याकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. स्वतः काही करायचे नाही, सरकारने शासकीय मदत म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई ही नंतर जो निर्णय होईल, त्या प्रमाणे केली जाणार आहे", असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Diwali relief package
FDA : पुण्यात एफडीएचा मिठाई-फराळ विक्रेत्यांवर छापा; २० परवाने निलंबित! तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस

"दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, दिवाळीमध्ये आपण एकटे आहोत, अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानूसार सर्वच मंत्री हे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. गावात, पालावर, शेताच्या बांधावर मंत्री जात आहेत. याच दरम्यान संजय शिरसाट यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांना सुनावले.

Diwali relief package
Gokul Court Case : सतेज पाटलांचा मोर्चा सुरू असतानाच कोर्टात सुनावणी, वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, 'सरकारचा निर्णय...'

शेतकऱ्यांबद्दल प्रेम दाखवणाऱ्या विरोधकांनी साधा फराळं तरी वाटला का? असा थेट सवाल त्यांनी केला. शिवसेनेच्या वतीने राज्यभरात गोरगरिब, सर्वसामान्यांना धान्य, फराळ, किराणा सामानाचे किट वाटप केले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवदेनशील नेते आहेत. शेतकरी,कामगार, मजूर यांच्याबद्दल आणि सर्वसामान्य जनतेची त्यांना काळजी आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाच्या घरातही दिवाळी झाली पाहिजे, या हेतूने शिवसेनेने फराळ, कीट वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विरोधक असं काही करताना दिसतात का? असा सवालही संजय शिरसाट यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.