Minister Atul Save News Sarkarnama
महाराष्ट्र

Atul Save News : 'ओबीसी' विद्यार्थ्यांसाठी 52 ठिकाणी वसतिगृह सुरू ; पाच हजारांहून अधिक प्रवेश निश्चित!

OBC Students Hostel News : बड्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार मोठी मदत ; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती!

Mayur Ratnaparkhe

Mahayuti Goverment and OBC News : ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी महायुती सरकारने, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात सुरू केलेल्या वसतिगृहाच्या सुविधेबाबत माहिती दिली. 'महाराष्ट्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आधीपासूनच आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ही सोय नव्हती. आता ५२ ठिकाणी ही सोय उपलब्ध झाली असून ५ हजार २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश तिथे निश्चित झाला आहे. आजवर आर्थिक परिस्थितीमुळे बड्या शहरांमध्ये शिक्षण घेऊ न शकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना विविध शहरांमधील या वसतिगृहांचा मोठा आधार मिळाला आहे.' असं त्यांनी सांगितले.

याचबरोबर 'आजवर मंजूर ७२ पैकी तब्बल ५२ वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित वसतिगृह सुरू करण्याच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे. येत्या काळात ही प्रवेशमर्यादा वाढण्याची शक्यता असल्याने ओबीसी(OBC) समाजातील विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.' अशी माहितीही दिली.

तसेच 'मुळात वसतिगृहाची सुविधा नसल्याने ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहावे लागत होते. अशावेळी त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहांची मागणी संघटनांकडून करण्यात आली. याची दखल घेत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत मुला-मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने केली. या मागणीच्या अनुषंगाने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून वसतिगृहांना मूर्त रूप देण्यात आले आहे.' असंही अतुल सावे(Atul Save) यांनी सांगितलं.

याशिवाय 'देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कल्याणासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. आता महायुती सरकारच्या काळात ओबीसींमधील विविध समाजांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळांची स्थापना करण्यात आली. ओबीसींसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद साडेचार हजार कोटी रुपयांवरून ८५०० कोटी रुपये करण्यात आली.' अशी माहिती भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी दिली आहे.

तर, तसेच ओबीसींच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखाच त्यांनी सादर केला. मोदी आवास योजनेंतर्गत ओबीसींसाठी१२ हजार कोटी रुपये खर्चून २०२६पर्यंत दहा लाख घरकुल उभारले जाणार आहेत. त्यासाठी पहिल्या वर्षाकरता ३ हजार ६०० कोटी रुपये मंजूर करून बांधकामाला सुरुवातही झाली असल्याचेही टिळेकर यांनी सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT