Rahul Gandhi helicopter News : झारखंड निवडणुकीसाठी प्रचारात असणाऱ्या राहुल गांधींचे हेलिकॉप्टर आज(शुक्रवार) गोड्डा येथे अडकलं होतं. कारण, एटीएसने या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी दिली नव्हती. परिणामी अर्धातासापेक्षा अधिक काळ राहुल गांधींना हेलिकॉप्टरमध्ये बसून रहावं लागलं. त्यांच्या हेलिकॉप्टरला हॅलिपॅडवरून उड्डाणास क्लिअरन्स दिलं गेलं नव्हतं. ज्यामुळे काँग्रेसने प्रचंड नाराजी व्यक्त करत, यासाठी भाजपला जबाबदार धरलं आहे.
काँग्रने(Congress) आरोपात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळेच राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला क्लिअरन्स दिलं गेलं नाही. राहुल गांधींचे हेलिकॉप्टर गोड्डा बेलबड्डामध्ये अडकले होते. हेलिकॉप्टरला वेळेवर क्लिअरन्स न मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापले आणि त्यांनी भाजपवर टीका सुरू केली. त्यांनी यासाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे.
गोड्डामध्ये हेलिपॅडवरच थांबलेल्या हेलिकॉप्टरचा आणि त्यात बसून क्लिअरन्स मिळण्याची वाट बघणाऱ्या राहुल गांधींचा फोटो समोर आला आहे. याशिवाय त्याठिकाणी हॅलिपॅडच्या सोभवताली राहुल गांधींचे(Rahul Gandhi) सुरक्षा रक्षकही तैनात दिसून आले.
झारखंडला सर्वच राजकीय पक्ष याप्रसंगी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबर रोजी पार पडले आहे. ज्यामध्ये 15 जिल्ह्यातील 43 मतदारसंघात मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये 38 मतदारसंघात मतदान होईल.
याआधी अशाच प्रकारचा आरोप झारखंड मुक्ति मोर्चाचे आमदार आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन(Hemant Soren) यांची पत्नी कल्पना सोरेन यांनीही लगावला होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हटले होते की, त्यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी दिली गेली नाही.लातेहारमध्ये एका निवडणूक रॅलीला फोनवरून संबोधित करत त्यांनी म्हटले होते की, झारखंडची जनता बघत आहे की कशाप्रकारे केंद्र आणि भाजपच्या इशाऱ्यावर झारखंडच्या लोकांचा अपमान केला जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.