Badlapur Ovary Case Links in Four States Sarkarnama
महाराष्ट्र

Badlapur Ovary Trafficking Case: कोण आहे बदलापूर अंडाशय तस्करीची सूत्रधार! गरीब महिलांना करीत होती टार्गेट; 4 राज्यात कनेक्शन

Badlapur Ovary Trafficking Racket: पोलिसांनी या कारवाईत १० लाखांहून अधिक किंमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती? औषधे कुणी पुरवली, याचा शोध सुरु आहे.

Mangesh Mahale

Shocking details of Badlapur ovary trafficking racket: गोरगरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करणाऱ्या बदलापूर येथील तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

या प्रकरणाचे रँकेट आता महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचे धागे-दोरे अनेक ठिकाणी पसरले असतील, असा पोलिसांना संशय आहे. प्रकरणाचा अधिक कसून तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे का, याचा छडा लावण्यात येत आहे. या घटनेमुळे मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांनी ठाणे, बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापे टाकले. ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवर देखील पोलिसांनी छापे टाकल्याची विश्वसनीय माहिती आहे. पोलिसांनी या कारवाईत १० लाखांहून अधिक किंमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती? औषधे कुणी पुरवली, याचा शोध सुरु आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील होते, याची माहिती पोलिस घेत आहेत.

अंडाशयाच्या या रॅकेटमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारत येत नाही. पोलिसांच्या तीन पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी तसंच बदलापूरमध्ये पोलिसांनी छापा टाकत झाडाझडती करण्यास सुरवात केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात सुलक्षणा गाडेकरसह 3 महिलांना अटक केली आहे. सुलक्षणा गाडेकर हीच या प्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. तिच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला आहे, यात अनेक संशयास्पद इंजेक्शन जप्त केली आहेत. सुलक्षणा ही गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्या अंडाशयाची तस्करी करायची. या प्रकरणामध्ये ३०० पेक्षा अधिक पीडित महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या महिलांना अंडाशयामागे २० हजार ००० रुपये दिले जात होते. तर यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत होते. त्यानंतर या अंडाशयांची कर्नाटक,केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती.

कोण आहे सुलक्षणा गाडेकर

(Who is Sulakshana Gadekar?)

  • सुलक्षणा गाडेकर ही बदलापुरामध्ये राहते.

  • तिच्या वैद्यकीय अनेक वस्तू आढळल्या आहेत.

  • ती महिलांना घरी बोलावून त्यांना इंजेक्शन द्यायची.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे त्यांची सोनोग्राफी करून घ्यायची.

  • गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर या महिलांना ती आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची.

  • त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढून घेतले जायचे.

  • त्यानंतर त्याची इतर राज्यात नेऊन विक्री केली जात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT